Gay जोडपं होणार आई बाबा !, ४ वर्षांपूर्वी थाटामाटात केलं होतं लग्न, फोटो झाले व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

यूएसमध्ये २०१९ मध्ये पारंपरिक हिंदू विवाह करणारे दोन तरुण अमित शाह आणि आदित्य मदीराजू आता आईवडील बनण्याचे प्लानिंग करत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी खूपच शाही पद्धतीने लग्न केले होते. ज्याचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. तर पुन्हा एकदा हे जोडपे चर्चेमध्ये आले आहे.

सध्या त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर समोर आले आहेत. जे अमित शाह आणि आदित्य मदीराजूच्या पॅटर्निटी फोटोशूटमधील काही फोटो आहेत. फोटोंमध्ये हे जोडपं लवकरच जन्म घेणाऱ्या आपला बाळाबद्दल माहिती देताना आणि हातामध्ये अल्ट्रासाउंड फोटो पकडलेले पाहायला मिळत आहे, ज्यावरून असे समजते कि आता हे जोडपं लवकरच आईवडील बनणार आहे.

अमित शाह आणि आदित्य मदीराजूच्या व्हायरल होत असलेल्या या पॅटर्निटी फोटोशूटमध्ये दोघेही खूपच आनंदी पाहायला मिळत आहेत. एका फोटोमध्ये जोडपं लहान मुलासाठी विणलेल्या लोकरीचे बूट घेतलेले पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते आपल्या पाळीव कुत्र्यासोबत बसलेले दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघे स्लेटवर अल्ट्रासाउंड स्केच बनवताना दिसत आहे. ज्यामध्ये गर्भामध्ये एक मुल पाहायला मिळत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो अमित शाह आणि आदित्य मदीराजू या दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटो पाहून त्यांना फॉलो करत असलेले इंस्टाग्राम युजर्स त्यांना शुभेच्छा देत आहेत. माहितीनुसार या वर्षी मेमध्ये हे कपल आपल्या बाळाला जन्म देऊ शकते. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Madiraju (@adityamadiraju)

Leave a Comment