सोशल मिडियावर नेहमी तुम्ही अनेक गेम्स आणि क्विज खेळत असाल. या गेम्स किंवा क्विजमध्ये तुम्हाला एकतर लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहीवेळा फरक शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत जो पाहायला एकदम सेम आहे पण लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला पाच फरक दिसतील.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्या दोन्ही मध्ये एका मुलाला तुम्ही व्हिडीओ गेम खेळताना पाहू शकता. मुलाच्या हातामध्ये रिमोट आहे आणि समोर स्क्रीन आहे. याशिवाय मुलाच्या आसपास एक छोटी कॉपी देखील ठेवली आहे. त्यासोबत एक पेंसिल दिसत असेल. हा फोटो डसायला एकदम सेम आहे पण यामध्ये पाच फरक लपले आहेत.
तुम्ही ३० सेकंदामध्ये हे पाच फरक शोधलेत का ? जर होय तर तुमची नजर खूपच तीक्ष्ण आहे. पण जर तुम्ही फोटोमधून पाच फरक शोधू शकला नाहीत तर नाराज होऊ नका. फोटोमधील फरक शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. चला तर मग सुरु करूयात.
पहिला फरक तर स्पष्ट दिसत आहे . पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला स्क्रीनवर गेम ओव्हर लिहिलेले दिसत असेल तर दुसऱ्या स्क्रीनवर तुम्हला गेमचे चित्र दिसत आहे. दुसरा फरक देखील सहज दिसतो. मुलाच्या आसपास जी पुस्तके पडली आहेत त्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये दोन्ही पानांवर काहीतरी लिहिले आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये फक्त एक पेजवर काही लिहिले आहे. तिसरा आणि चौथा फरक मुलाच्या चेहऱ्यामध्ये लपला आहे. पहिला फोटोमध्ये पाहू शकता कि मुलाचे डोळे आणि ओठ पाहून असे वाटते कि मुलगा अस्वस्थ आहे. पण दुसऱ्या फोटोमध्ये पाहिलेत तर मुलगा खुश दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये मुलाच्या डोक्यावर पिंक कलरचे काहीतरी बनलेले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये असे काही नाही.