खूपच सुंदर आणि ग्लॅ’मरस आहे ‘निर्मिती सावंत’ची ‘सुनबाई’, सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूडच्या अभिनेत्री देखील पडतील फिक्क्या…

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. निर्मिती सावंतचे नाव कलाविश्वामध्ये आदराने घेतले जाते. चित्रपट, सिरियल्स, नाटक अशा विविध ठिकाणी निर्मितीने आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आपल्या अभिनयाने दर्शकांचे मनोरंजन करून तिने दर्शनाकांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे. निर्मिती सावंतची ओळख एक विनोदी अभिनेत्री म्हणून केली जाते. सोशल मिडियावर तिची चर्चा कायम रंगलेली असते.

कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर यासारख्या सिरियल्स तिच्या खूपच गाजल्या होत्या. निर्मिती सावंत लवकरच आपल्याला किचन कल्लाकार या रियालिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. पण सध्या निर्मित वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे.

या चर्चेमध्ये कारण तिची सुनबाई आहे. निर्मिती सावंतची सुनबाईदेखील एक प्रसिद्ध कलाकार आहे. निर्मिती सावंतचा मुलगा अभिनय सावंत याने पूर्वा पंडितसोबत लग्न केले. अभिनय देखील त्याच्या आईप्रमाणे एक उत्तम अभिनेता आहे तर पूर्वा डुडल आर्टिस्ट आहे.

पूर्वा सोशल मिडियावर अॅक्टिव असून ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत तिच्या पर्सनल लाईफबद्दल देखील सर्व गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असते. पूर्वा एक डुडल कंपनीची मालकीण आहे. त्यामुळे ती स्वतःच डुडल तयार करत असते. पूर्वाने तिची सासूबाई निर्मित सावंतसोबत आपले अनेक फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Leave a Comment