बाई वाड्यावर या’ हा डायलॉग ऐकला तर आपसूकच निळू फुले यांचे नाव तोंडात येते. एक रांगडा अभिनेता असलेले अभिनेते निळू फुले यांनी आपल्या भारदार अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर त्यांनी तब्बल ४० वर्षे मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले.
मराठी चित्रपट सृष्टी जेव्हा पौराणिक आणि कौटुंबिक कथांमध्ये अडकून पडली होती तेव्हा निळू फुले यांनी खलनायकी रूपाने चित्रपटाला एक वेगळा तडका दिला. एक गाव बारा भानगडी चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
निळू फुले यांची कन्या देखील त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते असे आहे. सध्या ती ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेमध्ये बेबी मावशीची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. गार्गी विवाहित असून २००७ मध्ये तिचा ओंकार थत्ते यांच्या सोबत विवाह झाला होता. दोघांना अनय नावाचा एक मुलगा देखील आहे.
गार्गीने तुला पाहते रे या मालीकेशिवाय कट्टी बत्ती या मालिकेमध्ये देखील काम केले आहे. कट्टी बत्ती हि मालिका सुरु असताना तिला तुला पाहते रे या मालिकेसाठी ऑफर आली होती पण कट्टी बत्ती मालिकेचे शुटींग सुरु असल्यामुळे तिने या मालिकेसाठी नकार दिला होता पण निर्माते काही काळ तिच्यासाठी थांबले आणि तिला या मालिकेमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली.