हॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन निक कैननच्या आयुष्यामध्ये आणखीन एक मुल येणार आहे. याचा खुलासा अभिनेत्याने सोशल मिडियावर केला आहे. ४१ वर्षीय निकचे हे ९वे मुल आहे. मॉडल ब्रिटनी बेलसोबत निकचे हे तिसरे मुल आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर ब्रिटनीच्या मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये निक आणि कैनन आणि मॉडल ब्रिटनी बेल रोमँटिक पोज देताना पाहायला मिळत आहेत. ब्रिटनी न्यू ड अवस्थेत तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तर निक तिला मिठी मारत रोमँटिक होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटनी बेल आणि निक कैननला आपल्या दोन्ही मुलांसोबत देखील पोज देताना पाहिले जाऊ शकते.
निक आणि ब्रिटनी यांना दोन मुले आहेत. एक ५ वर्षाचा मुलगा ज्याचे नाव गोल्डन सैगन आणि एक १९ महिन्याची मुलगी जिचे नाव पावरफुल क्वीन आहे. व्हिडीओ शेयर करत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले की, वेळ थांबला आणि हा झाला. हि बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सोशल मिडिया युजर्स खूपच हैराण आहेत. अनेक युजर्स निकची खिल्ली उडवत आहेत तर काहींचे मानणे आहे कि अभिनेत्याने आता थांबले पाहिजे. एका युजरने लिहिले आहे कि, थांब आता भाऊ, तर दुसऱ्याने लिहिले आहे, जर याला आपल्या सर्व मुलांना शिकवायचे असेल तर एक शाळा भाड्याने घ्यावी लागेल.
तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि भाऊने संपूर्ण शहरच बनवले आहे. तर एकाने लिहिले आहे या माणसाची कोणीतरी नसबंदी करा. तर एकाने लिहिले आहे, हे खूपच विचित्र आहे. हे जाणूनबुजून करत आहे. ही काही मजेदार गोष्ट नाही. गोल्डन आणि पावरफुल शिवाय निक कैननचे आणखीन मुले आणि वेगवेगळे पार्टनर्स आहेत. एक्स वाइफ आणि सिंगर मारिया कॅरीसह निक कॅननला दोन जुळी मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. ११ वर्षाच्या या मुलांचे नावे मुनरो आणि मोरक्कन आहेत. या वर्षी जुलैमध्ये निकने मॉडेल ब्रे टायसीसोबत एका मुलाचे स्वागत केले आहे. या मुलाचे नाव कपलने लेजेंडरी लव कैनन ठेवले आहे.
View this post on Instagram
फेमस डीजे आणि प्रेजेंटर एबी दे ला रोजासोबत निक कैननला जुळे मुले आहेत. १३ महिन्यांच्या या मुलांची नावे जिओन आणि जिलियन अशी आहेत. एबी सध्या तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सिंगर अलिसा स्कॉटसोबत देखील निकला एक मुलगा होता, ज्याचे नाव जेन होते. २०२१ मध्ये पाच महिन्याच्या वयामध्ये जेनचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले.