लग्नानंतर अवघ्या ‘तीन’ दिवसांमध्येच नयनताराने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; म्हणाली; स्वतःला लांब ठेवत…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा नुकतेच दिग्दर्शक विघ्नेशसोबत विवाहबंधनामध्ये अडकली आहे. नयनतारा आता आपले वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. पण लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांमध्ये नयनताराने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

माहितीनुसार नयनतारा आता चित्रपटामध्ये इं’टि मे’ट सी’न्स करण्यापासून स्वतःला लांब ठेवणार आहे. नयनताराने चित्रपटामधील हिरोसोबत रोमॅंटिक सीन न करण्याचा निर्णय घेतला आहे. नयनताराचे म्हणणे आहे कि आपला पती दिग्दर्शक विघ्नेश शिवमसोबत ती आपले वैवाहिक आयुष्य एन्जॉय करणार आहे.

त्यामुळे नयनतारा आता काही दिवसांसाठी साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेऊन परत आल्यानंतर नयनतारा कसलेही इं’टि मे’ट सी’न्स करणार नाही हे पक्के ठरवले आहे. तथापि अभिनेत्रीने याविषयी उघडपणे वक्तव्य केलेले नाही.

नयनतारा शाहरुख खानच्या आगामी जवान चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानने ऑनस्क्रीन इंटिमेट सीन देण्यापासून स्वतःला लांब ठेवले आहे. अर्थातच या चित्रपटामध्ये तरी नयनताराला तिची अट घालण्याची काही गरज नाही.

नयनताराच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तीने ९ जून रोजी दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली होती. नयनताराच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नयनताराच्या लग्नामध्ये शाहरुख खानपासून ते रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

लग्न झाल्यानंतर नयनतारा तिरुपतीला देवदर्शनासाठी गेली होती. तेथील मंदिर परीसरामध्ये चप्पल घालून फिरल्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. त्यानंतर मंदिर समितीने तिला कायदेशीर नोटीस देखील बजावली. यानंतर नयनताराला जाहीर माफी मागावी लागली.

Leave a Comment