नागराज मंजुळे यांच्या पत्नीला पाहिलंत का.? Nagraj Manjule Wife पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…

By Viraltm Team

Published on:

Nagraj Manjule Wife

Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कोण नाही ओळखत. नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली असे म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. चित्रपटांतील साधेपणा, विषयातील गंभीरता आणि मातीतील कलाकार या मिश्रणामुळे त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना जवळचा वाटतो.

त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे पण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. प्रत्येकजण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. दरम्यान आता त्यांच्या पत्नी आणि मुलाबद्दल नुकतीच एक माहिती समोर आली आहे.

Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni

नागराज मंजुळे नेहमी आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल मनमोकळेपणाने बोलत असलेले पाहायला मिळत. पण त्यांनी कधीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा केला नाही. त्यांची पत्नी कोण होती, ती कशी दिसत होती, त्यांना मुले आहेत का. असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. दरम्यान आता स्वतः नागराज मंजुळे यांनी आपल्या पत्नी आणि मुलाबद्दल खुलासा केला आहे.

नागराज मंजुळे हे सध्या घर बंदूक बिर्यानी या चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आले आहेत. सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटामधून पुन्हा एकदा नागराज मंजुळे आणि आकाश ठोसरची जोडी दर्शकांना पाहायला मिळणार आहे. एका प्रमोशन फंक्शन दरम्यान नागराज मंजुळे यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला पहिल्यादाच समोर आणले.

Nagraj Manjule Wife Photos

Gargi Kulkarni

संपूर्ण टीम हि स्टेजवर उपस्थित होती. दरम्यान नागराज मंजुळे यांनी कोणी राहिलंय का असे विचारले तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा तिथे नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी दोघांना बोलावून घेतले आणि गार्गी (Gargi Kulkarni) आपली पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले.

नागराज मंजुळे यांनी गार्गी कुलकर्णीसोबत लग्न केले आहे. गार्गी एक निर्माती आहे आणि नागराज यांच्या आटपाड प्रोडक्शन हाऊसमध्ये त्या निर्मितीचं काम पाहतात. दोघांना एक मुलगा देखील आहे जो आता त्यांच्या आगामी घर बंदूक बिर्यानी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडितने केले स्पष्ट वक्तव्य, म्हणाली; ‘नागराज मंजुळे आकाशला…’

Leave a Comment