दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्याने नुकतेच एका शानदार सोहळ्यात बंगळुरूस्थित उद्योगपती अनुषा शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली. २० नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या सुंदर सोहळ्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक कपड्यांमध्ये सजलेली हि जोडी स्वर्गामध्ये बनलेल्या जोडीसारखी दिसत आहे. सोशल मिडियावर समोर आलेल्या व्हिडीओ नुसार नवविवाहित जोडप्याने त्यांच्या आयुष्याच्या नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत खूप मस्ती केली.
कर्नाटकमध्ये १९ नोव्हेंबर रोजी हळदी आणि कॉकटेल पार्टी साहीर लग्नाच्या अगोदरचे सर्व कार्यक्रम झाले. लग्नामध्ये आलेल्या लोकांद्वारे सोशल मिडियावर शेयर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये या शाही विवाहसोहळ्याची झलक पाहायला मिळते.
त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसहित प्रत्येकजण नवीन जोडप्यालाला आशीर्वाद देण्यासाठी तिथे उपस्थित होते. कारण त्यांनी एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. दोघांची क्युट जोडी पाहून त्यांच्यावरून नजर हटवणे खूपच कठीण आहे.
मेहेंदीची विधी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता एका आलिशान हॉटेलमध्ये झाली. यासाठी ड्रेस कोड इंडियन फेस्टिव- पेस्टल होता. नागा शौर्यने काळ्या पटियाला आणि मॅचिंग सँडलसह निळा कुर्ता घातला होता. ती सिंपल ड्रेसमध्ये देखील नवरदेवासारखा दिसत होता.
नवरीबद्दल बोलायचे झाले तर ती नारंगी, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या पेस्टल, फ्लोरल, एम्ब्रॉयडरी लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. हिरव्या रंगाच्या नेटच्या ओढणीने तिने आपला लुक पूर्ण केला होता. व्हिडीओमध्ये तिची आई, उमा आणि वडील शंकर प्रसाद देखील दिसत आहेत. जे आपल्या मुलीचे लग्न पाहून खूपच आनंदी दिसत आहेत.
View this post on Instagram