पतीच्या मृत्यूपूर्वी पत्नी दररोज करायची ‘हे’ काम, जाणून घेतल्यानंतर तुमचे देखील डोके चक्रावून जाईल…

By Viraltm Team

Published on:

मुंबईमधील एक मर्डर मिस्ट्री सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. पोलीसदेखील यामुळे चक्रावून गेले आहेत. मुंबई पोलिसांनी याच्या छडा लावला हे. पण या घटनेमध्ये जे काही घडले आहे ते खूपच धक्कादायक आहे आणि डोके चक्रावून सोडणारे आहे.

कविता नावाची एक महिला आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांना मुंबई पोलिसांनी कमलकांत शाह याच्या ह त्येच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. कविता आणि कमलकांत पती पत्नी आहेत. कवीन तिचा पती कमलकांत याला जेवणामधून रोज थोडे थोडे वि ष देत होती.

ती त्याच्या जेवणामध्ये आर्सेनिक आणि थेलियम थोडे थोडे करून मिसळायची. यानंतर १७ दिवसांमध्ये तिचा पती कमलकांत याचा मृ त्यू झाला. कमलकांतला ३ सप्टेंबर २०२२ रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

कमलकांतला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कविता नावाच्या एका महिलेला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतले आहे. महिलेवर असे आरोप आहेत कि तिनेच तिचा पती कमलकांतची ह त्या केली आहे. कविता आणि तिचा प्रियकर यांना ८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

३ सप्टेंबर २०२२ रोजी कमलकांतला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १९ सप्टेंबर पर्यंत त्याच्यावर उपचार सुरु होते. पण डॉक्टरांना त्याला वाचवण्यात यश मिळाले नाही. कमलकांतचा ज्याप्रकारे मृत्यू झाला ते डॉक्टरांना कुठेतरी खटकत होते. त्यामुळे कमलकांतवर ज्यावेळी उपचार सुरु होते तेव्हा त्याच्या रक्ताची तपासणी केली गेली.

त्यानंतर जे रिपोर्ट समोर आले ते पाहून डॉक्टरांचा संशय आणखीनच बळावला. डॉक्टरांना कमलाकांतच्या रक्तामधून आर्सेनिक आणि थेलियम आढळून आले. कोणत्याही माणसाच्या शरीरात धातूचं प्रमाण वाढणे हि सामान्य बाब नसते. त्यामुळे हि माहिती त्यांनी पोलिसांना दिली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment