मुकेश अंबानी झाले आजोबा, अंबानी कुटुंबामध्ये जुळ्या मुलांचे आगमन, ईशा अंबानी झाली आई, पहा मुलांची देखील ठेवली नावे…

By Viraltm Team

Published on:

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आजोबा बनले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाचे लग्न उद्योगपति अजय आणि स्वाति पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामलसोबत झाले आहे. ईशाने एक मुलगा आणि एक मुलगीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवले आहे.

ईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाह बंधनामध्ये अडकले होते. ईशा मुकेश अंबानी आणि नीता अंबानीची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने रिलायन्सचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली होती. तिला ऑक्टोबर २०१४ मध्ये रिलायंस रिटेल आणि रिलायंस जियोमध्ये जागा देण्यात आली होती. मुकेश अंबानी २०२० मध्येच आजोबा बनले होते जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने १० डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला होता. आता मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले आहेत.

आनंद पीरामलने पेन्सिलवेनिया विश्वविद्यालय मधून इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे आणि हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून बिजनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. तर ईशाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर डिग्री मिळवली आहे. ईशाने सुरुवातीचे शिक्षण मुंबई स्थित धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल मधून केले.

नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर फोर्ब्सने २०१८ मध्येच ईशा अंबानीची संपत्ती ७० दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता. रिलायन्स ग्रुपमध्ये वडिलांना मदत करण्यापूर्वी ईशानेही नोकरी केली होती. मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काही काळ काम केले.

२०१५ मध्ये ईशाला आशियामधील सर्वात शक्तिशाली आगामी व्यावसायिक महिलांच्या यादीत स्थान मिळाले होते. रिलायंस जियो ईशा ईशाचा पहिला प्रोजेक्ट होता. य्नान्त्र ती रिलायंसच्या रिटेल बिजनेसवर फोकस करू लागली. ईशा अंबानीच्या देखरेखीमध्ये एप्रिल २०१६ मध्ये AJIO चे लॉन्चिंग झाले होते, जे रिलायन्स ग्रुपचे मल्टी-ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे.

Leave a Comment