मुंबईच्या जवळ धावपळीच्या जीवनापासून दूर घ्या गावाचा आनंद, पहा सुंदर फोटोज…

By Viraltm Team

Published on:

मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानीच नाही तर मायानगरीचे अनोखे रंग देखील आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबई पर्यटकांसाठी खूपच खास आहे. असे म्हंटले जाते कि हे शहर कधीच झोपत नाही, वेळेनुसार ते धावत असते आणि या शहराची लाइफस्टाइल खूप वेगळी आहे. तथापि या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेकवेळा तणावाने भरून जातो.

अशामध्ये आज आपण या पोस्टमधून मुंबईच्या जवळ स्थित एका अशा ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे जाऊन तुम्ही शहरी लाइफस्टाइलला काही वेळेसाठी विसरू शकता. ज्या ठिकाणाबद्दल आम्ही बोलत आहोत त्याचे अनव मॉन्टेरिया विलेज आहे. हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे आहे. मुंबई आणि पुण्यापासून इथे तुम्ही फक्त दोन तासामध्ये पोहोचू शकता.

हे ठिकाण साधेपणा आणि आधुनिक जीवनाच्या सुविधांमधून योग्य संतुलन आहे. जे तुम्हाला कामामधून ब्रेक घेण्यास आणि मनामध्ये नवीन उर्जा निर्माण करण्यास संधी देते. जवळ जवळ ३६ एकरामध्ये पसरलेल्या या जागेची निर्मिती अशाप्रकारे करण्यात आली आहे कि तुम्हाला इथे तुमच्या बालपणीची किंवा तुमच्या गावाची आठवण येईल. इथे जाऊन तुम्ही गावातील दैनंदिन जीवन, संस्कृती, पाककृती, मनोरंजन, या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

या विलेजमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या एक्सपीरियंसची मजा घेऊ शकता. मग गावामध्ये आरामात फिरण्याची मजा असो किंवा बागेमध्ये एखाद्या झाडाखाली निवांत बसण्याची मजा असो. तुम्हाला हवे असेल तर गोशाळेमध्ये तुम्ही गायींची सेवा देखील करू शकता किंवा शेतामध्ये काम देखील करू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monteria Village (@monteriavillage)

मुंबईहून या ठिकाणी पोहोचणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्हाला कर्जत स्टेशन जावे लागले आणि इथून तुम्हाला ऑटो घेऊन मोंटेरिआ विलेज जाता येईल. तुम्ही राईड करून मुंबई पुणे हायवे हून शिळफाटा रोडने खालापूरला जाऊ शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monteria Village (@monteriavillage)

Leave a Comment