बिग बॉसच्या घरामध्ये कंटेस्टेंट आपल्या खेळाशिवाय आपल्या महागड्या आउटफिट आणि स्टाइलमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्यामधीलच एक आहे एमसी स्टॅन. बिग बॉस सीजन १६ चा विनर आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅनबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
वास्तविक बिग बॉस १६ मध्ये लोकप्रिय कंटेस्टेंट एमसी स्टॅन टॉप ५ मध्ये सामील होता आणि आता तो या सीजनचा विनर बनला आहे. शिव ठाकरेला मात देऊन एमसी स्टॅनने बिग बॉस १६ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. चाहत्यांचा मनामध्ये नेहमी राहतात लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन आज ज्या ठिकाणी आहे त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.बिग बॉसचा कंटेस्टेंट एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याचे शिक्षणामध्ये कमी आणि गाण्यामध्ये जास्त मन लागायचे. जेव्हा तो १२ वर्षाचा होता तेव्हा पासूनच त्याचे कव्वाली गायला सुरुवात केली होती. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबत देखील परफॉर्म केले आहे. एक वेळ अशी देखील होती कि त्याला रस्त्यावर रात्र घालवावी लागली होती.
जेव्हा स्टॅनजवळ पैसे देखील नव्हते तेव्हा त्याला रस्त्यावर रात्री घालवाव्या लागल्या. एमसी स्टॅनने हिम्मत हरली नाही आणि त्याने आपल्या मेहनतीच्या बळावर स्थान मिळवले. एमसी स्टॅनने आपल्या गाण्याद्वारे आपल्या लाईफची स्टोरी देखील सांगितली आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला. अस्तगफिरुल्लाह या गाण्यामध्ये त्याने आपल्या संघर्षाची स्टोरी सांगितली आहे.एमसी स्टॅनने तसे तर अनेक गाणी गायली आहेत पण त्याला वाटा या गाण्यामधून जास्त लोकप्रियता मिळाली होती, ज्याला युट्युबवर २१ मिलियनपेक्षा जास्त व्हिव आहेत. एमसी स्टॅनला भाताचा टुपॅक देखील म्हंटले जाते. आज तो हिप-हॉप इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चेहरा बनला आहे. हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग देखील करत होता.
एमसी स्टॅन २३ वर्षाचा आहे आणि इतक्या कमी वयामध्ये त्याने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तो म्हणतो कि त्याने फक्त ३-४ वर्षांमध्ये इतका पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या एमसी स्टॅनचे नेट वर्थ ५० लाखाच्या आसपास आहे. तो दर महिन्याला आपल्या गाणी आणि युट्युब कॉन्सर्ट मधून लाखो रुपये कमवतो.