आई झाल्यानंतर ‘से क्सी’ आणि ‘मा दक’ दिसायचे नाही का ? ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत…

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्री उर्मिला युट्यूबवर मेकअप आणि स्टाईलचे धडे देत असते. उर्मिला गेल्या वर्षी आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती बरेच दिवस युट्यूबवरून गायब झाली होती. मात्र आता तिने पुन्हा युट्यूबवर रिएंट्री केली आहे.

इतकेच नाही तर तिने आता युट्यूब व्हिडीओ तयार करण्यासाठी एक स्टुडिओ देखील तयार केला आहे. उर्मिला सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते. सध्या तिने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. लांबलचक पोस्ट लिहून तिने बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेत्री आपल्या पोस्ट आणि व्हिडीओमधून मुली आणि स्त्रियांसाठी हेल्थ, मेकअप, फॅशन,मदरहूड अशा अनेक विषयांवर गाईड करण्याचे काम करत असते. त्याचबरोबर ती आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ शेयर करत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचे काम करत असते.

यादरम्यान तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले साडीमधील काही फोटोज शेयर केले आहेत. या फोटोमध्ये ती इंडो वेस्टर्न लुकमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने ब्लाऊज आणि साडीमध्ये खूपच बोल्ड पोज दिल्या आहेत. पण नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान तिने आणखीन एक पोस्ट शेयर करून नेटकऱ्यांनी बोलती बंद केली आहे.

उर्मिला पोस्टमध्ये म्हणते कि आई झाल्यानंतर महिलेने सुंदर-मादक दिसायचे नाही असा समजच होऊन बसलाय. आई झाल्यानंतर देखील महिलेला सुंदर आणि से क्सी दिसावे वाटते. आपले वजन कमी करून संपूर्ण ताकदीनिशी पुन्हा जोमाने काम करावे वाटते. आपले बाळ, घर करियर, सर्व काही हेल्दी आणि सौंदर्याने भरलेले असावे असे तिला वाटते.

खरंतर ही काळजी तिच्या घरातील सर्वांनीच घ्यायला हवी! ही काळजी घेताना पुन्हा एकदा आत्मविश्वास कमावणे महत्त्वाचे. आणि इतरांनी तिला या सगळ्या roles मधून जाताना साथ द्यायला हवी! या पोस्टचा उद्देश trollers ना धडा शिकवणं नसून, नविन विचारांना वाट दाखविण्याचा आहे. अभिनेत्रीची हि पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने हे देखील विचारले आहे कि मला बाळ झालं तर आता मी साडीत मादक पोज पण द्यायची नाही का ?

Leave a Comment