लग्नाच्या दीड वर्षामध्येच मानसी नाईकचं नवऱ्यासोबत बिनसलं, घटस्फोटाच्या चर्चांना उधान…

By Viraltm Team

Published on:

मराठीमोळी अभिनेत्री मानसी नाईक मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या गाण्यांमुळे ती खूप लोकप्रिय झाली. पण सध्या ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये आली आहे.

काही दिवसांपासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. दोघे लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. मानसीचा पती एक बॉक्सर आणि मॉडेल आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

सोशल मिडियावर सक्रीय असणारी अभिनेत्री आपल्या पतीसोबतचे फोटो नेहमी सोशल मिडियावर शेयर करायची. पण काही दिवसांपासून ती पतीसोबतचे फोटो शेयर करत नाही आहे. तिच्या नवऱ्याने देखील तिच्यासोबतचा फोटो शेयर केलेला नाही.

त्यामुळे सध्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात होत आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वीच वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही अशाप्रकारची पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केली होती. यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

यादरम्यान तिने आपले रोमँटिक फोटो देखील सोशल मिडिया अकाऊंटवरून डिलिट केले होते. इतकेच नाही तर तिने आपल्या अकाऊंटवरून आपल्या नवऱ्याचे आडनाव देखील हटवलं आहे. त्यामुळे आता लग्नाच्या अवघ्या दीड वर्षांमध्येच दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र दोघांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये सर्वकाही ठीक असावे अशी चाहते अशा करत आहेत.

Leave a Comment