अखेर घटस्फोटांच्या चर्चांवर मानसी नाईकने सोडले मौन, खुलासा करत म्हणाली; ‘आज देखील मला…’

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणत होत होत्या. यावर आता मानसी नाईकने मौन सोडले आहे.

मानसी नाईकने कबूल केलं आहे कि ती तिचा पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार आहे. तिने म्हंटले आहे कि मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. मानसी आणि तिचा पती प्रदीप यांनी सोशल मिडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि दोघांनी एकमेकांचे फोटो डिलिट केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आली होती.

आता अभिनेत्री मानसी नाईकने स्वतःच तिचा पती प्रदीप खरेरापासून वेगळे झाल्याच्या चर्चांवर पुष्टी देत यावर स्पष्टीकरणही दिले आहे. एका मुलाखतीदरम्यान मानसी नाईकने गेल्या काही दिवसांपासून सुरु आसलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडल आहे.

ती म्हणाली कि आमच्या घटस्फोटाबद्दल ज्या चर्चा सुरु आहेत त्या खऱ्या आहेत. मी खोट बोलणार नाही, मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. मी सध्या खूपच दुःखी आहे. नेमकं काय चुकलं हे सांगणं सध्यातरी माझ्यासाठी खूप कठीण आहे.

आमच्यामध्ये काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे खूपच वेगाने घडले. आजदेखील माझा प्र्माव्र विश्वास आहे आणि मला पुन्हा प्रेम करायचे आहे. एक वेळ अशी होती कि मला कुटुंब हवे होते आणि म्हणून मी लग्न केले. हे सर्व घाईघाईत झाला. कदाचित यामुळेच झालं असेल. या नात्यामधून बाहेर पाण्याची वेळ आता आली आहे.

मानसी नाईक पुढे म्हणाली कि मला आता पूर्णपणे करियरवर फोकस करायचे आहे. सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझ कुटुंब, मित्र मी आणि माझे चाहते हेच माझ्यासाठी महत्वाचे आहेत. कधी कधी आपला माणसांवरील विश्वास उडतो आणि माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असं काहीच घडलं नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

Leave a Comment