कडक उन्हामध्ये चिमणीला तडपताना पाहून व्यक्तीने पाणी पाजून वाचवला जीव, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

थंडीनंतर आता गर्मी वाढायला सुरुवात झाली आहे. आता गर्मी अशी वाढली आहे कि पंख आणि एसीची गरज भासू लागली आहे. अशामध्ये रस्त्यावर बाहेर पडणाऱ्या लोकांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. माणूस तसे तर स्वतःसाठी पाण्याची सोय करू शकतो पण पक्षी आणि प्राण्यांचे काय, ज्यांच्या नैसर्गिक संसाधनांवर माणसांनी कब्जा केला आहे. अशा देखील जीवांसमोर संकट उभे राहू लागले आहे. ठिकठिकाणी ते पाण्यासाठी तहानलेले दिसून येतात. तथापि त्यांच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर राहिले पाहिजे.

अवनीश शरण नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये रस्त्यावर तहानेने तडपणाऱ्या चिमणीला एका व्यक्तीने पाणी पाजवून जीवन दान दिले आहे. चिमणी इतकी तहानलेली होती कि तिला उडणे तर दूर तिला धड चालता देखील येत नव्हते. अशामध्ये एका वाटसरूने तिची गरज समजून तिला बाटलीच्या टोपणामध्ये पाणी पाजवले. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता कि एक चिमणी रस्त्यावर तहानेने तडपताना दिसत आहे. पण जे जीवांवर प्रेम करतात त्यांना अशा अवस्थेमध्ये पाहू शकत नाहीत. जसे व्हिडीओमध्ये पाहू शकता कि एका व्यक्तीने पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी घेतले आणि चिमणीच्या चोचीपर्यंत नेले, तहानेने व्याकूळ झालेल्या चिमणीने लगेच पाणी प्यायला सुरुवात केली. जशी तशी तहान मिटली तशी तिच्या उर्जा आणि उत्साह दिसू लागला. पण जर त्या व्यक्तीने चिमणीची मदत केली नसती आणि तिला पाणी पाजवले नसते तर तिचा जीवन संकटात सापडला असता.

रस्त्यावर चिमणीला पाजवतानाचा व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक त्याच्या चांगुलपणाचे कौतुक करत आहेत. अधिकाऱ्याने व्हिडीओ शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि दयाळूपणाचे सर्वात छोटे कार्य सर्वात मोठ्या हेतुपेक्षा जास्त मोलाचे आहे. एका सायकलस्वाराने तहानेने व्याकूळ झालेल्या चिमणीला पाहून तिला पाणी पाजवले. कृपया पक्ष्यांसाठी थोडे पाणी बाहेर ठेवा.

Leave a Comment