मराठी सिनेसृष्टीवर शोककळा ! महेश कोठारेंवर कोसळला दुःखाचा डोंगर, आदिनाथ कोठारेने दुःखद बातमी शेयर करून दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता महेश कोठारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना पितृशोक झाला आहे. आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माता अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे निधन झाल्याची माहिती नातसून उर्मिला कोठारेने दिली. त्यांच्या पार्थिवावर बोरीवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या माग्बे त्यांची पत्नी जेनम, मुलगा आणि प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

आजोबांच्या निधनानंतर नातू आणि अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी भावूक पोस्ट शेयर करत चाहत्यांना याची माहिती दिली. पोस्ट शेयर करत त्यांनी संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये . “संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना”, असं लिहिलं आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईमध्ये झाला होता. त्यांचे बालपण खूपच कष्टामध्ये गेले. घरची परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच काम करावे लागले. त्यांनी शिक्षण पूर्ण करून ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत नोकरी देखील केली. नोकरी करत असताना त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासला.

इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती देखील केली. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे शेकडो प्रयोग देखील त्यांनी केले. झुंजारराव हि त्यांची नाटकामधील भूमिका खूपच गाजली होती.

प्रसिद्ध अभिनेते निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा हातभार लागला आहे. महेश कोठारे यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्यांनी खूप कष्ट घेतले होते. धुमधडाका चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी महेश कोठारे यांची खूप मदत केली.

त्यानंतर महेश कोठारे यांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मोलाचा हातभार लावला. दे दणादण चित्रपटामधील त्यांची खलनायकाची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

Leave a Comment