महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून अमाप प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री वनिता खरातने नुकतेच लग्न केले आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत सप्तपदी घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून वनिताच्या लग्नाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत होत्या. अखेर २ फेब्रुवारी रोजी अभिनेत्रीने थाटात लग्न केल. सध्या या नवीन जोडीवर सेलेब्स सोबत चाहते देखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून वनिताच्या लग्नाची लगबग सुरु होती. तिच्या प्रीवेडिंग फोटोशूटमधील काही फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्या हळदीचे आणि लग्नापूर्वीचे फोटो खूप व्हायरल झाले होते. तिच्या हातावरील मेहेंदीने सर्वांचे लक्षण वेधून घेतले होते. सध्या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्रीच्या लग्नामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती आणि तिला शुभेच्छा दिल्या. वनिताच्या नवऱ्याविषयी बोलायचे झाले तर तिचा नवरा एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सोशल मिडियावर नेहमी तो आपले व्हिडीओ शेयर करत असतो.
वनिताने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले. ती म्हणाली कि आम्ही दोघे लुडो खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि एकमेकांना डेट करू लागलो. वनिता आणि सुमित दोघे आधीपासूनच चांगले मित्र होते.
वनिताने तिच्या मेहेंदीसाठी हिरव्या रंगाच्या कुर्त्याची निवड केली होती तर हळदीसाठी तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन निवडला होता. तर तिच्या नवऱ्याने सेम कलाकृती असलेला कुर्ता परिधान केला होता. रोमँटिक पोजमधील या कपलचे फोटो सध्या विशेष व्हायरल झालेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram