टीव्ही इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. भाबी जी घर पर है मधील मलखान उर्फ दीपेश भान यानंतर आता क्योंकि सास भी कभी बहू थी मधील अभिनेत्री केतकी दवेचे पती आणि अभिनेता रसिक दवेचे निधन झाले आहे. २९ जुलै २०२२ रोजी रात्री ६५ व्या वर्षी रसिक दवेने शेवटचा श्वास घेतला.

माहितीनुसार रसिक दवेचे निधन किडनी फेलरमुळे झाले. ते गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. अभिनेता किडनी संबंधी आजाराशी झुंज देत होता. त्याची किडनी सतत खराब होत होती आणि गेल्या एक महिन्यापासून त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट राहिली. आज म्हणजे ३० जुलै २०२२ रोजी त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत.

केतकीने टीव्ही अभिनेता रसिकसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव रिद्धी दवे आहे. रसिकने अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात १९८२ मध्ये पुत्र वधू या गुजराती चित्रपटामधून केली होती.

त्यांनी हिंदी क्षेत्रामध्ये देखील काम केले. मासूम चित्रपटामधून त्यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. केतकी आणि रसिकने २००६ मध्ये नच बलियेमध्ये देखील भाग घेतला होता. अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर रसिकने संस्कार: धरोहर अपनों की या टीव्ही सिरीयलमधून कमबॅक केले होते. रसिक दवेला महाभारत मधील नंदाच्या भुमिकेसाठी देखील ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ketki Dave 🔵 (@ketki_dave_)

ऐसी दीवानगी देखी नहीं कही सिरीयलमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. रसिक आणि केतकी एक गुजराती थिएटर कंपनी देखील चालवत होते. केतकी दवे बद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. ती गुजराती फिल्म इंडस्ट्रीचा देखील भाग राहिली आहे. तिची आई सरिता जोशी एक अभिनेत्री आहे आणि तिचे दिवंगत वडील प्रवीण जोशी देखील एक थिएटर दिग्दर्शक होते. तिला एक लहान बहिण पूरब जोशी आहे, जी एक अभिनेत्री आणि अँकर देखील आहे.