सध्या रानबाजार हि वेबसिरीज प्लानेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या वेबसिरीजच्या टिझर आणि ट्रेलरनं दर्शकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रींनी या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
पॉलिटिकल थ्रिलर वेबसिरीज सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या वेबसिरीजमध्ये बो ल्ड आणि भ ड क सीन देऊन चांगल्याच चर्चेमध्ये राहिल्या होत्या. यासाठी त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.
प्राजक्ता आणि तेजस्विनी यांच्या या सीनची चर्चा थंड होत नाही तोवर आता रानबाजारमधील कुंडी लगालो सय्या या गाण्यावरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. वेबसिरीजमधील हे बोल्ड गाणे नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे.
हे गाणे वेबसिरीजच्या भागाच्या शेवटी ऐकायला मिळते. पहिल्या पाच एपिसोडचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढचे तीन भाग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अशामध्ये आता हे गाणे सोशल मिडियावर चांगले ट्रेंड झाले आहे. अभिनेत्री माधुरी पवारचा या गाण्यावरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिचा बो ल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. माधुरी हि एक उत्कृष्ठ डांसर असून तिचा हा बो ल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
View this post on Instagram
प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे डॉ. पल्लवी श्यामसुंदर यांनी गायले असून भिजीत पानसे यांनी हे गाणे लिहिले आहे. माधुरी पवारने या वेबसिरीजमध्ये प्रेरणा पाटील हि महत्वाची भूमिका साकारली आहे. सिरीजमधील माधुरीचा टक्कलमधील लुक दर्शकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
सध्या माधुरीचा कुंडी लगाओ सय्या गाण्यावर माधुरीचा डान्स पाहून तिचे चाहते चांगलेच चक्रावून गेले आहेत. माधुरीच्या या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली आहे कि लोक म्हणता मेल्यावर स्वर्गामध्ये अप्सरा भेटते पण आम्हाला तर जिवंतपणीच अप्सरा बघायला मिळाली.