अरुणने ऑटोवरच बनवले आलिशान घर, आहे सर्व आवश्यक सुविधांनी सज्ज…

By Viraltm Team

Published on:

ते म्हंटले जाते ना प्रत्येकामध्ये कोणतेना कोणते टॅलेंट लपलेले असते. फक्त जिद्दीची आवश्यकता असते जेणेकरून ते टॅलेंट समोर येते. जेव्हा मनामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द निर्माण होते तेव्हा माणूस काहीही करू शकतो. अनेक लोक असे असतात जे आपल्या बुद्धीचा प्रयोग करून अशी कमाल करून दाखवतात जे आपल्या कल्पनेच्या बाहेर असते. अशीच काही कमाल तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामधील अरुण प्रभूने केली आहे.
अरुण पेशाने आर्किटेक्ट आहे. त्याने त्याच्या स्वप्नातील जे घर बनवले आहे ते इतरांसाठी एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. चेन्नईचा २३ वर्षीय अरुण प्रभूने असे घर बनवले आहे ज्यामध्ये ज्यामध्ये फक्त राहताच येत नाही तर फिरता देखील येऊ शकते. त्याने आपल्या कल्पनेला मूर्त रूप दिले आहे आणि त्याने ऑटोवरच एक सुंदर घर बनवले आहे. ज्यामध्ये आवश्यकतेनुसार सर्व सोयीसुविधा आहेत. त्याने हे घर स्वतःच डिझाईन केले आहे आणि याला सोलो ०.१ नाव दिले आहे.
अरुणचे हे चालते फिरते घर छोटे आणि पण यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत ज्या एका सामान्य व्यक्तीच्या घरामध्ये असतात. त्याच्या घरामध्ये एक बेडरूम आहे, एक मॉड्यूलर किचन आणि बाथरूम देखील आहे. हे संपूर्ण घर कोणत्याही प्लॉटवर नाही तर एका ऑटोवर बनवले आहे. फोटो पाहण्यापूर्वी तुम्ही याची कल्पना करू शकता. अरुण सांगतो कि या मोबाईल होमची प्रेरणा चेन्नईमध्ये मिळाली होती.

त्याने चेन्नईमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. २०१९ दरम्यान जेव्हा त्याने चेन्नई आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये वेळ घालवला तेव्हा त्याला जाणीव झाली कि इथे सर्व सुविधा मिळत नाही आहेत. एक झोपडी बनवण्यासाठी देखील ४-५ लाख रुपये खर्च होतात. लोकांची गरज आणि या विचारामुलेच त्याने ऑटोवर मोबाईल होम बनवण्याची कल्पना सुचली आणि त्याने ऑटो रिक्शाला घरामध्ये बदलले.
अरुण जास्त सुशिक्षित कुटुंबातून नाही पण तो आपल्या कुटुंबामध्ये असा पहिला व्यक्ती आहे ज्याने ग्रेजुएशन पूर्ण केले आहे. अरुणच्या कुटुंबामध्ये सर्वजण व्यवसाय करतात. अरुण म्हणतो कि झोपडपट्टीमध्ये सर लोक घाणीत राहतात, तिथे स्वच्छता नसते. अशाच अ स्वच्छ वातावरणामध्ये जेवण बनवले जाते आणि खाल्ले जाते. हे सर्व पाहून त्याला हि कल्पना सुचली.
त्याच्या आधीपासूनच विचार होता कि अशाप्रकारच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणावे. अशा छोट्या वस्त्यांमध्ये बहुतेक कुटुंब ५०-१०० स्क्वेअर फुटच्या घरामध्ये आयुष्य घालवतात. अस्वच्छ वातावरणामुळे येथील लोकांना आरोग्यासंबंधी समस्या होतात. अरुण जेव्हा चेन्नईमध्ये होता तेव्हा त्याने ऑटोला घरामध्ये बदलताना पाहिले होते. तिथे लोक ऑटोमध्येच रात्र घालवत असत.
तो या थ्री-व्ही लर कॅरेवानला पेटंट देखील करून घेणार आहे. ज्यासाठी त्याने अर्ज देखील केला आहे. अरुणने सांगितले कि त्याने ६ बाय ६ लेआउटवर या घराचे डिझाईन केले आहे. या चालत्या फिरत्या घराची खास गोष्ट हि आहे कि यामध्ये सौर उर्जेद्वारे विजेची पूर्तता केली जाते, ज्यासाठी अरुणने यामध्ये ६०० वॅटचा सोलर पॅनल बसवला आहे. २५० लिटरच्या टाकीबरोबरच स्वयंपाकघर आणि बाथरूमसाठी प्लंबिंग फिटिंग देखील केले गेले आहे. ऑटोवर बनवलेल्या या घरामध्ये एका ७० लिटरच्या कंटेनरची व्यवस्था देखील केली आहे ज्यामध्ये कचरा जमा होता. नंतर याला स्वयं रिकामे केले जाते. हे तीन चाकी घर बनवण्यासाठी अरुणला फक्त एक लाख रुपये खर्च आला आहे.

Leave a Comment