कल्याणी कुरळे नंतर आता आणखी एका मराठी कलावंताचे अपघाती निधन, फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्यामुळे जागीच मृ’त्यू…

By Viraltm Team

Published on:

पंढरपूर येथे एक फॉर्च्युनर कार ५० फुट खोल दरीमध्ये कोसळल्यामुळे ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले आहे. अपघातादरम्यान तिघेजन गंभीर जखमी झाले आहेत. मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना हा अपघात झाला. यामध्ये ज्येष्ठ लावणी कलावंत मीन देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघातामध्ये त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतात जवळच्या गावामधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली.

तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. गाडी जिथे कोसळली होती तिचे उतरायला जागा नसल्यामुळे बचत कार्याला खूप अडथळे येत होते. स्थानिकांच्या सहाय्याने जखमींना दोरीने बाहेर काढून उपचारासाठी उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यादरम्यान ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे जागीच निधन झाले. रात्रीच्या वेळी अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने कार ५० फुट खोल कालव्यामध्ये पडल्याचे सांगितले जात आहे.

पंढरपूर कुर्डुवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचं काम चालू असताना पाटबंधारे खात्याकडून अद्यापही या पुलाबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हा पूल सध्या खूपच धोकादायक बनला आहे. असा आक्षेप मनसे जिल्हा प्रमुख प्रशांत गिड्डे यांनी घेतला आहे.

Leave a Comment