KGF स्टार यशची चित्रपटामधून होते ‘मॉनस्टर’ कमाई, संपत्तीचा आकडा इतका आहे कि ऐकून डोळे पांढरे होतील…

By Viraltm Team

Published on:

‘केजीएफ’ चित्रपटामधून अमाप लोकप्रियता मिळवलेला अभिनेता यश सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. त्याच्या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकोर्ड मोडीत काढत नवीन रेकोर्ड बनवला आहे. यानिमित्त आज आपण यश नेमका एका चित्रपटासाठी किती फीस आकारतो आणि त्याची संपत्ती किती आहे जाणून घेऊया.

‘केजीएफ’ चित्रपटाचा सुपरस्टार यश सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा आणि लोकप्रिय अभिनेता बनला आहे. अभिनेता यश एका चित्रपटासाठी करोडो रुपये फीस आकारतो. यश गेल्या १० वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असून त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेता यशला खरी ओळख ‘केजीएफ’ चित्रपटामुळेच मिळाली. माहितीनुसार यशच्या एकूण संपत्तीचा आकडा हा ५३ करोड रुपये आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला केजीएफ १ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर यश आपल्या कुटुंबासोबत बेंगलोरमध्ये एका डुप्लेक्स फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला ज्याची किंमत जवळपास ५ करोड इतकी आहे.

केजीएफ २ चित्रपटासाठी यशने ८ ते १० करोड रुपये इतके घसघशीत मानधन घेतले आहे. त्याचबरोबर यशच्या ताफ्यामध्ये अलिशान गाड्यांचा देखील सामावेश आहे. यामध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज आणि ऑडी अशा लक्झरी ब्रँडच्या कार आहेत ज्याची किंमत करोडोमध्ये आहे.

यश कन्नड आणि तेलगु अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करतो. याशिवाय तो ब्रँड प्रमोशन करून देखील बक्कळ पैसा कमवतो. त्याचबरोबर अभिनेता यश मोठ-मोठ्या ब्रँड्सचा अॅम्बेसेडर देखील आहे. नुकतेच यशने खलनायक नावाच्या परफ्यूमची जाहिरात केली होती ज्यासाठी त्याने करोडो रुपये मानधन घेतले होते.

Leave a Comment