ब्रिटिश मॉडल केली ब्रुक जगातील सर्वात सुंदर महिला मानली जाते. एका वैज्ञानिक सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला गेला आहे कि केली ब्रुकचा चेहरा आणि शरीर जगामध्ये सर्वात सुंदर आहे. ती प्रमापेक्षा पातळ नाही किंवा जाड देखील नाही. तिची उंची आणि शरीराचे प्रमाण जगामध्ये सर्वात परफेक्ट आहे.
केली ब्रुक एक इंग्लिश मॉडल, अभिनेत्री आणि सोशलाइट आहे. केली ब्रूकचे पूर्ण नाव केली ऍन पार्सन्स आहे. केली ब्रुकचा जन्म २३ नोव्हेंबर १९७९ रोजी इंग्लंडच्या केंट स्थित रॉचेस्टरमध्ये झाला होता. ग्रॅझिया मासिकासाठी ५००० पेक्षा जास्त महिलांच्या सर्वेक्षणात ब्रूकच्या फिगरला सर्वोत्कृष्ट मत देण्यात आले. या सर्वेमध्ये लोकांना जो प्रश्न विचारला गेला त्यामध्ये एखाद्या स्त्रीची उंची, तिचे केस, तिचे वजन, चेहऱ्याचा आणि नितंबाचा आकार यांचा समावेश होता.
वैज्ञानिकांनी सर्वात पहिला या रिसर्चमध्ये लोकांना विचारले कि त्यांच्यानुसार एका सेक्सी फिगर वाल्या महिलेची बॉडी साईज काय असली पाहिजे. लोकांच्या उत्तरानुसार केली ब्रुक सर्व पॅरामीटर्सवरमध्ये बसत असल्याचे सिद्ध झाले. वैद्यकीय शास्त्रानुसार केली ब्रूकच्या शरीरातील प्रत्येक भाग पूर्णपणे परिपूर्ण आहे. केली ब्रूक यूकेमध्ये मॉडेलिंगसाठी आणि यूएसमधील NBC सिटकॉम वन बिग हॅप्पी मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
ब्रुक सेलिब्रिटी जूसवर एक नियमित पॅनेलिस्ट म्हणून देखील ओळखली जाते. ब्रुकने अनेक टीव्ही शोमध्ये गेस्ट म्हणून अभिनय केला आहे, ज्यामध्ये स्ट्रिक्टली कम डांसिंग, द नाइटली शो, लूज वीमेन और ब्रिटेन गॉट टॅलेंट सिरीज ३ मध्ये तिने जजची भूमिका केली होती. ब्रुकला स्टाईल आयकॉन मानले जाते. केली ब्रूक वयाच्या अठराव्या वर्षी एमटीव्ही, ग्रॅनडा टेलिव्हिजन आणि द ट्रबल टीव्ही चॅनेलवरील युवा कार्यक्रमांचा प्रमुख चेहरा बनली होती.
ब्रुकला २००५ मध्ये FHM चा जगातील सर्वात सेक्सी वुमनचा किताब मिळाला होता. २०१५-१९९८ पासून प्रत्येक FHM च्या १०० सर्वात सेक्सी काउंटडाउनवर आहे. ब्रुकने एक अभिनेत्री म्हणून एब्सोलन (२००३), फिशटेल (२००७), पिरान्हा ३ डी (२०१०), कीथ लेमन: द फिल्म (२०१२), आणि टेकिंग स्टॉक (२०१५) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ब्रुकने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मॉडलिंग सुरु केली होती आणि तिने ज्या सौंदर्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये ती जिंकत गेली.
ब्रुकच्या फिगरवर डेली स्टार टॅब्लॉइडच्या संपादकीय टीमची नजर पडली ज्यानंतर पेज थ्री गर्ल म्हणून ब्रुकचे फोटो छापले जाऊ लागले. सप्टेंबर २०१० मध्ये ब्रुकने अमेरिकन मॅगझिनच्या ‘प्लेबॉय मॅगझिन’साठी फोटोशूट केले. ब्रुक एनिमल लवर आहे यासाठी ती PETA मोहिमेत देखील सहभागी झाली आहे. केली ब्रुक २००४ मध्ये बहामासच्या एलुथेरामध्ये थ्रिलर सर्व्हायव्हल आयलंडचे शुटींग करताना अमेरिकन अभिनेता बिली झेनला भेटली. ज्यानंतर २००८ पर्यंत दोघे एकत्र राहिले. ब्रुकचे नाव रग्बी खेळाडू थॉम इवांससोबत देखील जोडले गेले होते. १६ मार्च २०११ रोजी ब्रुकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गरोदर असलायची घोषणा केली होती पण तिचा गर्भपात झाला. २०१३ मध्ये ब्रुक आणि इवांसचा घटस्फोट झाला.