कौतुकास्पद ! वारीमध्ये सामील होऊन ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

सध्या महाराष्ट्र दोन कारणांमुळे खूप चर्चेमध्ये आहे. एक म्हणजे महाराष्ट्रामधील सध्याच्या स्थितीमधील राजकीय वातावरण आणि दुसरे म्हणजे दोन वर्षांनंतर पुन्हा सुरु झालेली वारी. वारीमुळे महाराष्ट्रामधील वातावरण भक्तीमय झाले आहे. वारीचा मोह मराठी कलाकारांना देखील आवरलेला नाही.

यामध्ये मराठी कलाकार देखील हिरीरीने भाग घेऊन वारीचा आनंद घेत भक्तीमध्ये लीन झाले आहेत. नुकतेच एक अभिनेत्री आपले शुटींग सोडून वारकऱ्यांची सेवा करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव कश्मिरा कुलकर्णी आहे.

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी वारीमध्ये सामील होऊन वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच कश्मिराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्याची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ शेयर करताना कश्मिराने लिहिले आहे कि, “वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो.”

कश्मिराने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने तिच्या संस्थेबद्दल देखील सांगितले आहे. ती या व्हिडीओमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना, कधी त्यांना जेवण देताना तर कधी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करताना पाहायला मिळत आहे. हे कारण करताना ती या भक्तीमय वातावरणामध्ये लीन झालेली पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmira Kulkarni (@actresskashmira)

कश्मिराने २०१९ मध्ये शुचिकृत्य या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत ती पालखी मार्गामधी वारकऱ्यांना औषधं, अन्नदान, मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा पुरवण्याचे काम करत असते. गेल्या काही वर्षांपासून तिचे हे काम अविरतपणे सुरु आहे. त्याचबरोबर तिची हि संस्था रग्रस्त, आदिवासी भागातील शाळेतील मुलांना कपडे, अन्नधान्य वाटप करण्याचे देखील काम करत असते.

Leave a Comment