जूनियर एनटीआरचा भाऊ नंदामुरी तारक रत्नचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता जूनियर एनटीआरचा भाऊ आणि तेलगु देशम पार्टीचे नेता नंदामुरी तारक रत्नचे निधन झाले आहे. ३९ व्या वर्षी नंदामुरी तारक रत्नने शनिवारी आपला शेवटचा श्वास घेतला आणि या जगाला निरोप दिला. नंदामुरीच्या निधनानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवी सहित अनेक कलाकारांनी नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माहितीनुसार आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये राजकीय रॅली दरम्यान विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी सांगितले कि ते २७ जानेवारी रोजी कुप्पममध्ये तेदेपा महासचिव नारा लोकेशच्या राज्यव्यापी पदयात्रेच्या सुरुवातीच्या दरम्यान पडले होते. माहितीनुसार जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर तारक रत्नला पुढच्या इलाजासाठी नारायण हॉस्पिटल बेंगलोर येथे नेण्यात आले होते.

पुढे असे म्हंटले जात आहे कि हॉस्पिटलमध्ये भरती केल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती आणि शनिवारी त्यांनी अंतिम श्वास घेतला. तारक रत्न जवळ जवळ २३ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. तारक रत्न, दिग्गज फिल्म अभिनेता आणि आंध्र प्रदेश पूर्व मुख्यमंत्री दिवंगत एन.टी. रामारावचे नातू आणि नंदामुरी मोहन कृष्णचा मुलगा होता. सोशल मिडियावर टॉलीवुड स्टार्ससोबत राजकीय नेते देखल त्यांना श्रद्धांजलि देत आहेत.

तारक रत्नने राजकारणामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी तेलगु चित्रपटांमध्ये अभिनय केला होता, ज्यामध्ये त्यांचा पहिला चित्रपट ओकाटो नंबर कुर्राडु होता जो २००२ मध्ये रिलीज झाला होता. तथापि त्यांना आरआरआर सारख्या प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम करणाऱ्या त्याचा लहान भाऊ जूनियर एनटीआरसारखी सफलता मिळाली नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाई.एस. जगन मोहन रेड्डी, तेदेपा प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू, अभिनेता चिरंजीवी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि इतर नेत्यांनी तारक रत्न यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Leave a Comment