धक्कादायक ! भाभी जी घर पर हैं मधील ‘या’ कलाकाराच्या मुलाचे निधन, अभिनेत्याने भावूक पोस्ट शेयर करत दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

काही महिन्यांपूर्वी टीव्ही जगतामधील चर्चित शो भाभी जी घर पर हैं मधील मलखान म्हणजेच अभिनेता दिपेश भानचे निधन झाले होते. आता पुन्हा एकदा या शोमध्ये अभिनेत्याच्या मुलाचे निधन झाले आहे. तो अभिनेता जितु गुप्ता आहे. जीतू गुप्ताच्या मुलांचे निधन झाले आहे.

माहितीनुसार जीतू गुप्ताच्या मुलाचे नाव आयुष होते आणि तो फक्त १९ वर्षाचा होता. आपल्या जवान मुलाला गमवल्याममुळे अभिनेता खूपच खचला आहे. नुकतेच कॉमेडियन सुनील पालने सोशल मिडियाद्वारे आयुषच्या निधनाची माहिती दिली आहे. या दरम्यान त्यांनी जीतू गुप्ताच्या मुलाची आठवण देखील काढली.

सुनील पालने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत आयुषच्या निधनाचा दुखद वार्ता दिली आहे. यासोबत त्याने भावूक करणारे शब्द देखील लिहिले आहेत. कॉमेडियनने आयुषच्या आठवणीत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे RIP भाबी जी घर पर है मधील अभिनेता माझा भाऊ जितुचे सुपुत्र आयुष राहिला नाही.

सुनील पालने आपल्या कॅप्शनमध्ये खूप सारे क्रायिंग इमोजी देखील टाकले आहेत. यावरून हे समजते कि त्याला आपल्या मित्राच्या निधनाचा किती मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार आयुष गुप्ता अनेक दिवसांपासून रुग्णालयात भारती होता.

त्याच्या वडिलांनी रुग्णालयातला एक फोटो देखील शेयर केला आहे ज्याला पाहिल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावतील. आयुष गुप्ताची प्रकृती खूपच गंभीर होती.

Leave a Comment