जया किशोरी खूपच प्रसिद्ध कथावाचीका आहे. ती देश-विदेशांमध्ये नानी बाई का मायरा आणि श्री मद् भागवतची कथा करते. तिच्या भक्तांच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न येतो कि आपण देखील जया किशोरी यांची कथा एकदा तरी जरूर करावी पण त्यांना हे समजत नाही कि कथा करण्यासाठी एकूण किती खर्च येऊ शकतो आणि जया किशोरी किती फीस घेतात.
एका माहितीनुसार जया किशोरीच्या बुकिंग ऑफिसच्या कर्मचाऱ्याने दावा करताना हे सांगितले आहे कि जया किशोरीजी एक कथा करण्यासाठी किती फीस घेतात. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार किशोरीजी एक कथा करण्यासाठी जवळ जवळ ९ लाख ५० हजार रुपये घेते. या फीसचा अर्धा हिस्सा म्हणजे जवळ जवळ ४ लाख २५ हजार रुपये ती कथा करण्याअगोदर घेते. तर अर्धी फीस कथा पूर्ण झाल्यानंतर घेतली जाते.
कथेमधून कमवलेले पैसे जया किशोरी नारायण सेवा संस्थानमध्ये दान करते. हि संस्था विकलांग लोकांसाठी काम करते. यामध्ये विशेष करून विकलांग लोकांना आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर त्यांना रोजगार आणि खाण्यापिण्याची देखील व्यवस्था पुरवली जाते. एका मुलाखतीमध्ये किशोरीजीने म्हंटले होते कि कथेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना विकलांग लोकांची मदत करण्याची संधी मिळत नाही आणि त्यांची सेवा करू शकत नाहीत. यामुळे दानद्वारे ती आपल्या हिस्स्याची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते.
फक्त इतकेच नाही तर किशोरी जी आपल्या कमाईमधील मोठा हिस्सा सामाजिक कार्यामध्ये देखील लावते. त्यांची ऑफिशियल वेबसाइट आए एम जया किशोरी डॉट कॉम नुसार किशोरीजी वृक्षारोपण आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवामध्ये देखील योगदान देतात. किशोरीजी सामाजिक कार्यामध्ये जास्त रुची ठेवतात. यामुळे त्यांना अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये पाहिले गेले आहे. त्याचबरोबर त्या मोटिवेशनल स्पीकर सेमिनार देखील करतात. ज्यामध्ये त्या लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देते.