राजस्थानच्या अर्जुनने जर्मनीच्या जुलीसोबत लग्न केले आहे. हे कपल सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. हे कपल युट्युब चॅनेलवर व्लॉग शेअर करते. जुळी भारताच्या देसी अंदाजामध्ये मिसळून गेली आहे. ती शेतामध्ये देखील काम करते. लोकांना जुलीचा हा अंदाज खूपच पसंद आहे. जुलीला अर्जुनवर प्रेम कसे झाले चला तर पाहूयात.
अर्जुनने सांगितले कि २०१८ मध्ये त्याची जुलीसोबत भेट झाली होती. तेव्हा तो कामासाठी दुबईला गेला होता, तर जुली तिथे फोटोशूट साठी आली होती. बीचवर जुलीला बिकिनीमध्ये पाहताच ती तिच्या प्रेमात पडला होता. तेव्हा जुली स्विमिंग करत होती. अर्जुनने स्वतः संवादाला सुरुवात केली होती. अर्जुनने जुलीला पोह्ण्याबाद्ल विचारले होते, नंतर जुलीच्या सौंदर्याचे कौतुक केले आणि नंतर सरळ तिचा नंबर मागितला. तथापि त्यावेळी जुलीने अनोळखी व्यक्तीला नंबर देण्यास नकार दिला पण अर्जुनने शेवटी तिचा नंबर घेतला.
दोन दिवसांनंतर जेव्हा जुलीने मेसेज केला तेव्हा अर्जुनच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघे भेटले आणि अर्जुनने जुलीला दुबई फिरवले. त्यांच्यामध्ये संवाद सुरु झाला आणि जुली महिनाभर दुबईमध्ये थांबली. तर ती फक्त दोन आठवड्यांसाठी दुबईला आली होती. जर्मनीला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद सुरु होता.
View this post on Instagram
यानंतर जुली भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. २०२० मध्ये अर्जुनने जुलीला प्रपोज केले आणि त्याच्या पुढच्या वर्षी दोघांनी लग्न केले. तेव्हापासून जुली भारतामध्ये राहत आहते आणि आता तिला हिंदी देखील चांगले बोलायला येते.
View this post on Instagram
जुलीच्या इंस्टाग्रामवर १० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर युट्युबवर तिच्या चॅनेलचे ६ लाख सब्सक्राइबर्स आहेत. इथे हे कपल आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व्हिडिओ शेअर करतात. नुकतेच जुलीचा शेतामध्ये काम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. यामध्ये तो कांद्याचे रोप लावताना दिसली ओटी. एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती गायीची दुध काढताना दिसली होती. काही आठवड्यांपूर्वी जुली ने एक व्हिडीओ शेयर करून दाखवले होते कि तिने लावलेली कांद्याची रोपे आता मोठी झाली आहेत. या व्हिडीओमध्ये ती गायीला चारा टाकताना दिसली होती त्याचबरोबर चुलीवर गरम पाणी करताना दिसली होती.