भारतातील सर्वात मोठ्या गायीच्या जाती, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

गायी पालनच्या व्यवसायामध्ये जिथे एकीकडे गायीचे गोमुत्र औषधी आणि कीटकनाशक म्हणून उपयोगी येते तर दुसरीकडे गायीचे शेन नैसर्गिक खत, मूर्ती आणि कंडे बनवण्यास मदत करते. शेतकरी शेतामध्ये गोमुत्र आणि शेणाचा वापर करून झिरो बजट शेती देखील करू शकतात. यामुळे बचत तर होतेच पण त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्न देखील होते.
साहीवाल: भारतामध्ये देशी आणि दुधाळ जातींबद्दल बोलायचे झाले तर लाल रंग्ची साहीवाल जास्त सर्वात अग्रस्थानी आहे. रूड शिगांच्या साहीवाल गायी पालनसाठी खूप पसंद केल्या जातात. भारताच्या उत्तर पश्चिमी क्षेत्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये साहीवाल गायी खूप प्रसिद्ध आहेत. साहीवाल गायी दिवसभर १०-२० लिटर आणि वर्षभरामध्ये २०००-३००० लिटर दुध देतात. साहीवाल गायीच्या दुधामध्ये फॅट आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण अधिक आढळते. गायीची ही जात भारताबरोबरच पाकिस्तानमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे.
गिर गाय: गिर गायीची डिमांड फक्त भारतामध्ये नाही तर इस्रायल, ब्राझीलसारख्या देशांमध्ये देखील मोठी मागणी आहे. गिर गायीचे नाव गुजरातच्या गिर जंगलाच्या नावावरून पडले आहे. गिर गायीला भारतामध्ये सर्वात दुधाळ गायीच्या नावाने देखील ओळखले जाते. गायीची हि जात दिवसभर ५०-८० लीर्त आणि वर्षभरामध्ये २४००-२६०० लिटर दुधाचे उत्पादन करते. लाल रंगाच्या मोठ्या कासेच्या या गायीला लांब आणि लाटकर कान असतात.
लाल सिंधी गाय: चांगले दुध उत्पादन आणि देखभाल करण्याच्या बाबतीत लाल सिंधी गायीचे देखील सामील आहे. एका वर्षामध्ये १८००-२२०० लिटर दुध देणारी हि गाय लाल रंगाची असते. लाल सिंधी गाय पहिला सिंध प्रांतामध्ये आढळत होती. जे आज पाकिस्तानमध्ये आहे. पण आता पंजाब, हरियाना, राजस्थान पासून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशामध्ये देखील या गायी आढळतात.
हरियाणवी गाय: जसे कि नावावरूनच हे स्पष्ट होते कि हरियाणवी गायीची उंची उंच असेत. नेहमी डोके वर करून चालणारी हरियाणवी गाय दिवसभरामध्ये ८-१२ लिटर दुधाचे उत्पादन करते. वर्षभरामध्ये जवळ जवळ २२००-२६०० लिटर दुधाचे उत्पादन होऊ शकत. हि गाय मुख्य रूपाने हरियानाच्या रोहतक, हिसार, सिरसा, करनाल, गुडगाव आणि जिंदमध्ये आढळते. जिथे हरियाणवी गायींचे पालन केल्याने चांगले दुध उत्पादन होते.
थारपारकर: गायीची थारपारकर जा देखील खूप दुधाळ असते. हि गाय मुख्य रूपाने पाकिस्तानातील कच्छ, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर आणि सिंध या वाळवंटी भागात आढळते. थारपारकर गायी कमी आहारी असून देखील एका दिवसात १० ते १६ लिटर दूध देतात. वाळवंटातील थारपारकर गायीची उष्णता सहन करण्याची क्षमता आहे. ही गाय एका वर्षात १८००-२००० लिटर दूध देते.
राठी गाय: राठी गाय मुख्य रूपाने राजस्थानच्या बिकानेर आणि श्रीगंगानगर मध्ये आढळतात. राठी गाय दिवसभरामध्ये १०-२० लिटर दुधाचे उत्पादन करतात. राठी गायीची खास बाब हि आहे कि ती कमी खाते आणि प्रत्येक वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे मिसळते. तसे तर राठी गाय एक मिश्र जात आहे. राठी गाय वर्षभरामध्ये १५००-१८०० लिटर दुध देते आणि या जातीचे बैल शेताच्या कामासाठी खूप चांगले मानले जातात.
कांकरेज गाय: कंकरेज जातीची गाय मुख्य रूपाने गुजरात आणि राजस्थानच्या भागामध्ये आढळते. या गायीपासून दिवसभरामध्ये ५-१० लिटर आणि वर्षभरामध्ये १८००-२००० लिटर दुधाचे उत्पादन होते. तथापि कांकरेज गायची चाल थोडी विचित्र असते. पण याची डिमांड विदेशामध्ये देखील खूपच वाढली आहे.
हल्लीकर गाय: हल्लीकर जातीची गाय महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये खूप प्रसिद्ध आहे. या जातीची गाय दुध चांगल्या प्रमाणात देते. याच्या दुधामध्ये ४.२ टक्के फॅट उपलब्ध असते. एका व्यातीनंतर या गायीपासून २४०-५१५ लिटर दुध मिळते. या जातीचे बैल देखील खूप शक्तिशाली असतात.
दज्जल गाय: दज्जल गायीची जात भागनारी नावाने देखील ओळखली जाते. हि मुख्यरूपाने पंजाबच्या दरोगाजी खाँ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संखेने आढळते. भागनारी गायीमध्ये दुध उत्पादन क्षमता अद्भुद असते. या गायीच्या देखभालीसाठी जास्त काही करावे लागत नाही.
नागौरी गाय: नागौरी गायीचे मूळ स्थान राजस्थानच्या नागौरमध्ये आहे. आपल्या वाहक क्षमतेमुळे या जातीच्या बैलांची मोठी मागणी आहे. नागौरी गाय एक व्यातीमध्ये ६००-९५४ लिटर पर्यंत दुध देते. इतकेच नाही तर नागौरी गायीच्या दुधामध्ये ४.९ टक्के फॅट आढळते.

Leave a Comment