सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंडिया पोस्टमध्ये या पदांसाठी निघाली भरती, दर महिन्याला मिळणार ६३,२०० रुपये पगार…

By Viraltm Team

Published on:

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही चांगली संधी आहे. इंडिया पोस्टने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रीयाद्वारे स्किल्ड आर्टिसनची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ९ जानेवारी २०२३ पर्यत अर्ज करता येतील.

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुत आहेत त्यांनी मागितलेल्या पात्रता पूर्ण करून अर्ज करू शकता. इंडिया पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in जाऊन तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेद्वारे, एमव्ही मेकॅनिकची ४ पदे, एमव्ही इलेक्ट्रीशियन (कुशल) १ पद, अपहोल्स्टररची १ पद आणि कॉपर आणि टिनस्मिथची १पद भरली जाणार आहेत. अशाप्रकारे या भरती प्रक्रीयेद्वारे एकूण ७ पदांची भरती करण्यात येणार आहे.

पात्र उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इंडिया पोस्ट ऑफिस रिक्रूटमेंट २०२३ ची पीडीएफ देखील पाहू शकतात. अर्ज शुल्काबद्दल बोलायचे झाल्यास यापैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या पदांचा भरतीसाठी कोणतीहि परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीद्वारे या पदांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास पात्र उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असावे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास या पदांसाठी उमेदवार ८ वी पास असावा. शिवाय संबंधित ट्रेडमध्ये शासन मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

पात्र उमेदवार विहित अर्जाद्वारे अर्ज करू शकता. उमेदवाराने अर्ज संबंधित कागदपत्रांसह वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सेवा, क्रमांक-३७, ग्रीम्स रोड, चेन्नई-६००००६ या पत्त्यावर पाठवावा. वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सेवा, क्रमांक-३७, ग्रीम्स रोड, चेन्नई-६००००६.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment