इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये १०वी आणि १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/ मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या १८८ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय पोस्टच्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज dopsportsrecruitment.in या अधिकृत वेबसाइटवर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२२ आहे.
कँडिडेट्सची प्रोविजनल लिस्ट ६ डिसेंबर २०२२ पर्यंत जारी केली जाईल. भारतीय डाकमध्ये हि भरती गुजरात सर्कलसाठी करण्यात येणार आहे. भारतीय पोस्ट भर्ती २०२२ रिक्त जागांसाठी तपशील: पोस्टल असिस्टेंट/ सोर्टिंग असिस्टेंट -७१ पदे, पोस्टमन/ मेल गार्ड -५६ पदे, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) -६१ पदे.
अवश्यक शैक्षणिक पात्रता: पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट या पदासाठी उमेदवार किमान १२वी पास असावा. तसेच किमान ६० दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा. पोस्टमन / मेल गार्डसाठी उमेदवार किमान १२वी पास असावा. यासोबतच गुजराती भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे. गुजराती भाषा हा विषय दहावीपर्यंत शिकलेला असावा. ६० दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्सही केलेला असावा. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी उमेदवार किमान १०वी पास असावा. गुजराती भाषा हा विषय दहावीपर्यंत शिकलेला असावा.
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे पूर्ण असावे. तथापि, MTS पदासाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
वेतनश्रेणी: पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट वेतनश्रेणी ४ नुसार रु. २५५०० ते रु. ८११०० प्रति महिना वेतन असेल. वेतनश्रेणी ३ नुसार पोस्टमन / मेल गार्ड २१७०० ते ६९१०० रुपये प्रति महिना वेतन असेल. मल्टि-टास्किंग स्टाफला (MTS) वेतनश्रेणी १ नुसार रु. १८००० ते रु. ५६९०० प्रती महिना वेतन असेल.
अर्ज शुल्क: भारतीय पोस्टल भरतीसाठी अर्जाचे शुक्ल हे १०० रुपये इतके आहे. महिला, ट्रान्सजेंडर, SC/ST, PWBD, माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.