भारतीय क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा अपघात कसा झाला याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहू शकता कि पंतच्या कारचा अपघात कसा झाला. अपघातानंतर पंतच्या कारला आग लागली आणि संपूर्ण कार जाळून खाक झाली. तथापि ऋषभ पंतच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला दुखापत झाली पण त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार आहे. डॉक्टर त्याच्या उपचार करत आहेत.
असे म्हंटले जात आहे कि अपघाताच्या वेळी तो स्वतः गाडी चालवत होता आणि यादरम्यान त्याला डुलकी लागली. अपघातानंतर ऋषभ पंत खिडकीची काच तोडून बाहेर आहे ज्यानंतर कारला आग लागली. यानांत्र स्थानिकांनी १०८ वर फोन लावून मदत बोलावली आणि त्याला हॉस्पिटलला पोहोचवले.
शुक्रवारी सकाळी रूडकीमध्ये पंतच्या कारचा अपघात झाला. अपघात डिव्हायडरला धडकल्यामुळे झाला. ज्यानंतर कारला आग लागली. पोलिसांनुसार ऋषभ पंत दिल्लीहून उत्तराखंडच्या रूडकी स्थित त्याच्या घरी जात होता. सकाळी जवळपास पाच वाजता कोतवाली मंगळूर परिसरातील मोहम्मदपूर जाटजवळ त्याची का डिव्हायडरला धडकली.
डिव्हायडरला धडकल्यामुळे कारला आग लागली. क्रिकेटपटू आणि त्याच्यासोबत बसलेल्या ड्रायव्हरसह अन्य एका व्यक्तीला गाडीतून बाहेर काढण्यात आले. सूचना मिळाल्यानंतर १०८ आणि हरिद्वार पुलिस द्वारा जखमींना सर्वप्रथम रूडकीच्या सक्षम रुग्णालयात नेले गेले.
रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभच्या कपाळावर आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
View this post on Instagram