बालविवाहनंतर इंस्पेक्टर बनून पूर्ण केले वर्दी घालण्याहे स्वप्न, भावांनी खांद्यावर बसवून गावातून काढली बहिणीची मिरवणूक…

By Viraltm Team

Published on:

असे म्हंटले जाते कि की जर स्वप्न मोठी असतील तर माणूस वाटेत येणाऱ्या सर्व संघर्षांना मागे टाकतो. असेच काहीसे राजस्थानच्या बाडमेर येथील रहिवासी हेमलता जाखड यांनी केले आहे. जिची ह्रदयस्पर्शी कथा सध्या सर्वांनाच आवडली आहे आणि त्यासोबतच लोकांना प्रोत्साहन देखील देताना पाहायला मिळत आहे. जर कष्ट आणि सोबत कोणतेही काम मनापासून केले तर मग कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झालेल्या हेमलताने आपले वर्दी परिधान करण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले ते जाणून घेऊया.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मुलगी हेमलता जाखड सध्या संपूर्ण गावात प्रोत्साहनचे प्रतीक बनली आहे. नुकतेच हेमलताची सब-इन्स्पेक्टर म्हणून पोस्टिंग झाली. सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांना यावर विश्वास बसला नाही. हेमलता यांनी स्वत: सांगितले की, ८ वर्षांची असतानाच तिने पोलीस निरीक्षक बनून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र या सगळ्यामध्ये हेमलता यांना संघर्षाचा सामना करावा लागला कारण वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी हेमलताचे लग्न झाले होते. हेमलताला समाजामध्ये टीकेचा देखील सामना करावा लागला, पण तरीही हेमलताने हार मानली नाही आणि तिने आज आपले स्वप्न साकार केले आहे.
हेमलताचे वयाच्या १७ व्या वर्षीच लग्न झाले आणि या कारणामुळे तिला कुटुंबाची काळजी घेत शिक्षण घ्यावे लागले. घराच्या चार भिंतीत राहून तिला हे काम करणं तिला खूप कठीण गेलं. याच कारणामुळे सरावासाठी घराबाहेर पडल्यावर गावातील समाजाच्या टीकेला तिला तोंड द्यावं लागलं. पण हेमलताने निश्चय होता की ती हे स्वप्न पूर्ण करणारच. जेव्हा हेमलता उपनिरीक्षकाची वर्दी घालून तिच्या गावी पोहोचली तेव्हा तिच्या भावांनी तिला खांद्यावर घेऊन गावभर मीरवले आणि तिच्या बहिणीने तिचे स्वप्न साकार केले हे दाखवून दिले. या होतकरू मुलीच्या टॅलेंटचे सर्वच कौतुक आहे.

Leave a Comment