साउथ फिल्म इंडस्ट्री सध्या बॉलीवूड चित्रपटांना तगडी टक्कर देत आहेत. हिंदी डबिंगनंतर तर हे चित्रपट देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फेवरेट बनले आहेत. यांनी फक्त साउथच नाही तर नॉर्थ इंडियाच्या चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे. हे चित्रपट हिट झाल्यानंतर यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची लोकप्रियता देखील कमालीची वाढली आहे. अशामध्ये आज आपण साउथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

या अभिनेत्री एका चित्रपटासाठी करोडो रुपये वसूल करतात. यांची फीस बॉलीवूडच्या अभिनेत्रींना तगडी टक्कर देते. चित्रपट मेकर्सदेखल यांना मागेल तेव्हडी रक्कम देण्यास तयार असतात. त्याला माहिती असते कि कलाकारांच्या जोरावरच त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी दर्शक थिएटरकडे खेचले जातात.

नयनतारा: नयनतारा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिला चित्रपटांमध्ये खूपच पसंद केले जाते. हेच कारण आहे कि ती एका चित्रपटासाठी तब्बल १० करोड रुपये फीस घेते. तिची वार्षिक कमाई १६ करोड रुपयेच्या आसपास आहे. ती एका जाहिरातीसाठी ५ करोड रुपये चार्ज करते. तिची एकूण संपत्ती ७४ करोड रुपये आहे.

रश्मिका मंदाना: पुष्पा फेम रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. ती देखील साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिच्या बॉलीवूड डेब्यू बद्दल खूप चर्चा रंगल्या आहेत. रश्मिका एका चित्रपटासाठी ३ करोड रुपये चार्ज करते. तिच्याजवळ एकूण ४५ करोड रुपयांची संपत्ती आहे.

पूजा हेगड़े: राधे श्याम फेम पूजा हेगड़े देखील साउथच्या मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ३१ वर्षीय पूजा एका चित्रपटासाठी ३ ते ४ करोड रुपये घेते. तर तिची एकूण संपत्ती ५१ करोड रुपये इतकी आहे. २०१२ मध्ये तिने तमिळ चित्रपट मुगामुदी मधून आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली होती. तर ओका लैला कोसम हा तिचा पहिला तेलगु चित्रपट आहे.

रकुल प्रीत सिंह: बॉलीवूड आणि साउथ अशा दोन्ही ठिकाणी काम करणारी रकुल प्रीत सिंह देखील दर्शकांमध्ये खूप पॉपुलर आहे. आधी ती एका चित्रपटासाठी १.५ करोड रुपये घेत होती. पण तिने अजय देवगणच्या रनवे ३४ चित्रपटासाठी ३.५ करोड रुपये घेतले होते. आपली लोकप्रियता वाढण्यासोबतच राकुल आपली फीस देखील वाढवत आहे.

समांथा रुथ प्रभु: समांथा तसे तर मुख्य रूपाने तमिळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये काम करते पण ती वेबसिरीजमध्ये देखील पाहायला मिळाली आहे. मेकर्स तिला एका चित्रपटासाठी ३ ते ५ करोड रुपये देण्यास तयार असतात. तिची एकूण संपत्ती ८० करोड रुपये आहे. ती एका आलिशान घर आणि अनेक लग्जरी कार्स देखील मालकीण आहे.