सध्या सोशल मिडियाचे युग चालू आहे. सोशल मिडियाद्वारे आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी माहिती होत असते. सोशल मिडियावर आपल्याला असे अनेक फोटो पाहायला मिळत असतात ज्यामध्ये गुपिते दडलेली असतात आणि ते आपल्याला शोधण्याचे आव्हान असते.
सोशल मिडियावर सध्या असाच एक फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. असे फोटो दररोज व्हायरल होत असतात आणि ते पाहिल्यानंतर लोक देखील त्यामधील कोडे सोडवण्यास सुरु करतात. अशा फोटोंमधून आपल्या मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम होत असतो.
ऑप्टिकल इल्युजनसंबंधी असाच एक फोटो सध्या चांगला व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक चेहऱ्यांमध्ये एक वेगळा चेहरा लपलेला शोधून काढायचा आहे. फोटोमधून तुम्हाला एक चोर शोधायचा आहे. हे काम अगदी सोपे आहे पण ते दिसते तितके सोपे नाही. फोटोमध्ये दडलेला चोर इतरांपेक्षा वेगळा आहे पण तो कुठे लपला आहे ? आपल्यामधील काही लोकांना अशा गोष्टी शोधून काढण्याची अद्भुत क्षमता असते. फक्त ५ सेकंदामध्ये तुम्हाला चोराला शोधून काढ्याचे आव्हान आहे.
हा फोटो टेडियाडोने शेयर केला आहे, ज्यामध्ये काही माइम कलाकार बनवलेले पाहायला मिळत आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. कोणी बॉल्समध्ये जुगलबंदी करत आहे तर कोणी सायकल चालवत आहे. फोटोमध्ये कुत्रे आणि ढग देखील दिसत आहेत.
रंजक बाब म्हणजे यामध्ये एक चोर देखील लपला आहे, जो इतरांप्रमाणेच दिसतो. पण तुम्ही जर निरखून पाहिले तर तुम्हाला तो लगेच ओळखता येईल. हे कोडे जर तुम्ही ५ सेकंदामध्ये शोधून दाखवले तर तुम्ही देखील खूप जीनियस आहात.
फोटोमध्ये लपलेला चोर सापडला का ? बर अशा आहे कि तुम्हाला चोर सापडला असेल. जर सापडला नसेल तर तो फोटोच्या खालच्या बाजूला दिसेल. त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क देखील लावला आहे.