जगामध्ये सर्वात गोड आणि संवेदनशील शब्द आई आहे. एक आई आपल्या मुलाला जन्म देण्यासोबत त्याची काळजी घेण्यामध्ये संपूर्ण जीवन घालवते. आई हीच मुलाची पहिली गुरु आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याची शुभचिंतक असते. पण आई फक्त मानवी जगतामध्येच इतकी संवेदनशील नाही तर प्राण्यांचा जगतामध्ये देखील आईला तोच दर्जा प्राप्त आहे जो मानवी जगतामध्ये आहे. अशाच एका मदर इंडियाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या आईची आठवण येईल.
हा व्हिडीओ भारतीय वन सेवेच्या अधिकारी सुधा रमन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सुधा यांनी व्हिडीओला भावूक आणि गोड कॅप्शन – कारण ती एक आई आहे. हा व्हिडीओ व्हायरलहॉगचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांना पावस्पासून वाचवण्यासाठी त्यांना आपल्या पंखाखाली घेऊन उभी आहे, आणि लहान पिल्ली तिच्या पंखाखाली स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी उभे आहेत. तुम्ही पाहू शकता कि कोंबडीला स्वतःची काहीच चिंता नाही, पण आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ती छत बनली आहे. ज्याखाली तिची लहान पिल्ले सुरक्षित आहेत. तथापि याआधी देखील पक्षांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये पक्षी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी पिल्लांना पंखांखाली सुरक्षित करतात. पण प्रत्येक व्हिडीओ हाच संदेश देतो कि आई ती आईच असते.
हा व्हिडीओ २४ तासांमध्ये इतका व्हायरल झाला आहे कि याला आता ७ हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. एकहजार पेक्षा जास्त लोकांनी याला रीट्वीट केले आहे. युजर या व्हिडीओवर भावूक होऊन प्रतिक्रिया देत आहेत. तथापि काही युजर्स हे देखील म्हणत आहेत कि जे यांना खातात त्यांना कमेंट करण्याचा काही अधिकार नाही. तर एका युजरने लिहिले आहे कि जगामध्ये सर्वात शक्तिशाली आई आहे. तर एकाने लिहिले आहे कि आईचा दर्स्जा देवापेक्षा देखील मोठा आहे.
Because she is a mother! pic.twitter.com/y5WhwihmFG
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) January 20, 2021