अभिनेत्री हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली; “…अन् मी तब्बल १६ तास झ…”

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ हि नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असते. हेमांगी अनेकवेळा सोशल मिडियावर आपले मत बिनधास्तपणे मांडत असते. सोशल मिडियावर ती नेहमी अॅक्टिव असते.

हेमांगी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेयर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहताना दिसते. नुकतेच हेमांगीने कामामुळे आपलेल्या तणावाबद्दल एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये तिने हे सांगितले आहे कि ताण कमी करण्यासाठी झोप किती महत्वाची असते.

हेमांगी कवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने दोन फोटो देखील टाकले आहेत. पहिल्या फोटोमध्ये एका प्लेटमध्ये फुलं ठेवलेली दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये हेमांगीचे स्मित हास्य पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हेमांगीने केसामध्ये त्यामधील एक फुलं घातले आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, बऱ्याच दिवसांपासून कामामुळे खूपच धावपळ झाली, त्याचबरोबर प्रवास देखील चालू होता म्हणून झोपेचे खोबरे झाले. काल खूपच लवकर पॅकअप झाल्यामुळे मला भरपूर वेळ मिळाला आणि मी घोडे बेचके झोपून गेले. तब्बल १६ तास झोपले आणि झोपेचा बॅकलॉग भरून काढला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)


आज उठल्यानंतर इतके ताजेतवाने वाटले कि कमाल वाटली. डोकं थाऱ्यावर आल्यासारखे वाटले आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात केली. सुख-दुखाचे कारण झोपच आहे असा मला साक्षात्कार झाला हे देखील पोस्ट मध्ये ती म्हणाली.

हेमांगी कवीची हि पोस्ट सध्या खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिच्या या पोस्टवर अक्षरशः लाईक आणि कमेंटचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. हेमांगी सध्या कलर्स मराठी वरील लेक माझी दुर्गा या सिरीयलमध्ये मुख्य भूमिका करताना पाहायला मिळत आहे. हि सिरीयल एका हिंदी सिरीयलचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment