इंडियन क्रिकेट टीमचा ऑलराउंडर आणि भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान राहिलेला हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा लग्न केले आहे. नताशा स्टेनकोविकसोबत हार्दिक पांड्याने ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.
हार्दिक आणि नताशाने लग्न करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची निवड केली. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दोघांनी उदयपुरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मिडियावर समोर आले आहेत आणि व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये नताशा व्हाइट गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर हार्दिक पांड्याने काळ्या कलरचा सूट घातला होता ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० रोजी मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केले होते.
तर लग्नाच्या एक वर्षानंतर दोघे एका मुलाचे आईवडील बनले होते. दोघांचे लग्न कोरोना काळामध्ये झाले होते. कपलने आता पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न केले आहे. हार्दिक पांड्याने लग्नाचे फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहे.
फोटो शेयर करताच अल्पावधीमध्येच ते सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो शेयर करत हार्दिकने लिहिले आहे कि आम्ही तीन वर्षापूर्वी घेतलेली शपथची पुनरावृत्ती करून आम्ही या प्रेमाच्या बेटावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पांड्याने पुढे लिहिले आहे कि आम्ही प्रेमाचा जल्लोष करण्यासाठी आमचे कुटुंब आणि मित्रांना सोबत मिळवून धन्यता मानत आहोत.
View this post on Instagram