राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नात शाही थाट ! अक्षया- हार्दिकच्या विवाह सोहळ्यातील राजेशाही लूक समोर…

By Viraltm Team

Published on:

तुझ्यात जीव रंगला सिरीयलमधील प्रसिद्ध जोडी हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांच्या लग्नाबद्दल अनेक दिवस चर्चा सुरु होती. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघांच्या चाहत्यांना त्यांना कधी एकदासे नवरा आणि नवरीच्या पाहतो असे झाले आहे.

आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना फार काळ वाट पहावी लागणार नाही आहे. आज दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांची लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. या लुकमध्ये अक्षया आणि हार्दिक दोघेही अगदी राजेशाही थाटामध्ये पाहायला मिळत आहेत.

या लोकप्रिय कपलच्या लग्नविधींना आता सुरुवात झाली आहे. नुकतेच दोघांच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अखेर आता दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. पहिल्या लुकमध्ये अभिनेत्री राणी कलरच्या नऊवारी साडीमध्ये पाहायला मिळत आहे आणि तिने कपाळावर चंद्राकोर काढली आहे. गळ्यामध्ये राजेशाही दागिने घातले आहेत. मोठाली ठुशी, चंद्रहार, नाकात नथ यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे.

तर हार्दिकने सोनेरी रंगाची शेरवानी घातली आहे आणि गळ्यामध्ये भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये एंगेजमेंट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Media. (@marathi.media)

Leave a Comment