‘हर हर शंभू’ महादेवाचे हे गाणे आहे कृष्ण भजनची कॉपी, यूट्यूबवरून हटवण्यात आले होते…

By Viraltm Team

Published on:

श्रावण महिना हा महादेवाचा पवित्र महिना आहे. कांवड़ यात्रा आणि श्रावण महिन्यामधील सोमवार या महिन्याला आणखीनच खास बनवतात. महादेवाचे भक्त देवाच्या भक्तीमध्ये कांवड़ यात्रा देखील करताना पाहायला मिळतात. अशामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि रस्त्यावर आपल्याला एकच धून धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे आणि ती धून आहे हर हर शंभू. या गाण्याला अभिलिप्सा पांडेने आवाज दिला आहे.

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झालेले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले हर हर शंभू हे गाणे एका कृष्ण भजनची कॉपी आहे. हर हर शंभू गाण्याचे जबरदस्त म्युझिक अच्युत गोपीच्या कृष्ण भजन वरून घेतले गेले आहे. जर तुम्ही अच्युत गोपीच्या आवाजामध्ये भज मन राधे’ गोविंद ऐकले तर तुम्हाला ते हुबेहूब हर हर शंभू या गाण्याशी मिळतेजुळते पाहायला मिळते. फक्त महादेवाच्या गाण्यामध्ये म्युझिकमध्ये थोडा फेरबदल करण्यात आला आहे.

कोणत्याही गायकासाठी हि वाईट गोष्ट असेल कि त्याचे गाणे रिलीज होताच डिलीट करण्यात येते. हर हर शंभू गाण्यासोबत देखील असेच झाले. यूट्यूबवर अपलोड करताच या गाण्यावर कॉपीराइट स्ट्राइक आला होता. ज्यानंतर गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. या स्ट्राइकबद्दल जितु शर्मा म्हणतात कि त्यांनी या गाण्याबद्दल अच्युत गोपी यांना सांगितले होते आणि त्यांना या गाण्यावर कोणतीही समस्या नव्हती. तर ते खूपच खुश होते कि त्यांच्या धूनवर महादेवाचे गाणे देखील बनले आहे.

महादेवाचे हे गाणे या श्रावणात सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत मिलियनमध्ये व्ह्युव आले आहेत. या गाण्यामुळे अभिलिप्सा आणि जीतू शर्मा रातोरात स्टार बनले आहेत. प्रत्येक फोनवर फक्त तीच धून ऐकायला मिळते. सर्वांच्या इंस्टा स्टोरीज, इंस्टा रीलमध्ये फक्त हेच गाणे वाजत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment