बकरीने दिला माणसासारखा चेहरा असलेल्या पिल्लाला जन्म, सोशल मिडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर नेहमी कोणतेना कोणते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत असतात. कधी तुम्ही असे फोटो आणि व्हिडीओ पाहून हसता तर कधी चकित होता. सोशल मिडियावर सध्या असाच एक फोटो समोर आला आहे जो पाहून लोक हैराण झाले आहेत. हा फोटो असमच्या कछार जिल्ह्यामधील असल्याचे सांगितले जात आहे.
इथे एका बकरीने माणसासारखा चेहरा असलेल्या पिल्लाला जम दिला आहे. या बकरीच्या पिल्लाचा चेहरा अगदी लहान बाळासारखा वाटत आहे. बकरीच्या पिल्लाच्या दोन पाय आणि कानांशिवाय संपूर्ण शरीर अगदी लहान बाळासारखे दिसत होते. तथापि हे बकरीचे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासानेच मरण पावले.
बकरीच्या पिल्लाला पाहून संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाहता हि बातमी आगीसारखी पसरली. अनेक लोक त्या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी करू लागले. अनेक लोकांनी बकरीच्या पिल्लाचा फोटो देखील काढला. सध्या हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

बकरीने अविकसित पिल्लाला जन्म दिला होता आणि त्याचा चेहरा अगदी एखाद्या लहान बाळासारखा दिसत होता. गाववाल्यांचे मानणे आहे कि काळ्या बकरीच्या पोटामधून मानवी बाळ जन्माला आले आहे, हे एखादे पूर्वज आहे. बकरीचे हे पिल्लू जास्त वेळ जिवंत राहिले नाही.
जन्माच्या अर्ध्या तासानंतर त्याचा मृत्यू झाला. बकरीच्या मालकाने सांगितले कि सोमवारी त्याच्या बकरीने एका मानवी मुलासारखा चेहरा असणाऱ्या पिल्लाला जन्म दिला तेव्हा त्याला पाहून सर्वजण हैराण झाले. बकरीच्या पिल्ला शेपटी देखील नव्हती.

Leave a Comment