आपल्या देशामध्ये वडिलांच्या संपत्तीवर मुलींच्या हक्काशी संबंधित अनेक लोकांना माहितीचा अभाव आहे. विशेषत: महिलांना याबाबत खूपच कमी माहिती आहे. अनेक महिला असे मानून चालतात कि वडिलांचा संपत्तीशी त्यांचे काही देणेघेणे नाही.
याशिवाय अनेक सामाजिक परंपरांमुळे मुलींना वडिलांच्या मालमत्तेतील हक्कापासून वंचित ठेवले जाते. आज आपण वडिलांच्या मालमत्तेवरील मुलींच्या हक्काशी संबंधित कायदेशीर तरतुदींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मालमत्तेवरील हक्क आणि हक्काच्या तरतुदींसाठी हा कायदा १९५६ मध्ये करण्यात आला होता.
यानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा तितकाची अधिकार आहे जितका मुलाचा असतो. मुलींच्या अधिकाराला बळकटी देण्यासाठी उत्तराधिकार कायद्यातील दुरुस्ती आणि २०२० मध्ये सुनावलेल्या निकालामुळे वडिलांच्या मालमत्तेवरील मुलीच्या हक्कांबद्दलच्या शंका संपल्या.
हिंदू उत्तराधिकार कायद्यात २००५ मध्ये संशोधन करून हे स्पष्ट केले गेले कि वडिलांद्वारे स्वतः कमवलेली संपत्तीवर मुलीचा मुलाच्या बरोबरीने अधिकार आहे. या दाव्यावर याने काहीच फरक पडत नाही कि वडिलांचा मृत्यू मृत्यूपत्र न बनवता झाला आहे किंवा नाही. दुसरीकडे २०२० मध्ये सुनावलेल्या एका निर्णयामध्ये असे म्हंटले गेले कि वाटणीमध्ये मिळणारी वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगी देखील आपला दावा करू शकते.
सुप्रीम कोर्टने याच वर्षी जानेवारीमध्ये वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या अधिकाराबद्दल एक ऐतिहासिक निकाल दिला होता. यामध्ये असे प्रावधान केले गेले कि संपत्ती (स्वतः मिळवलेली किंवा वाटणीमध्ये मिळालेली) वारसाहक्का मिळवण्याचा अधिकार मुलीना देखील आहे.
हिंदी वाडीला ज्यांचे मृत्यूपत्र न बनवता देहांत होते त्यांच्या संपत्तीवर मुलीला कौटुंबिक सदस्य जसे कि वडिलांचे भाऊ किंवा भावाची मुले-मुलीवर प्राधान्य दिले जाईल आणि त्यांना आपल्या भावाप्रमाणे अधिकार असतील. वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी मुलगी न्यायालयात जाऊ शकते. त्यासाठी त्याला दिवाणी न्यायालयात खटला भरावा लागणार आहे. दावा बरोबर असल्यास वडिलांच्या मालमत्तेत मुलीला हक्क मिळेल.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.