श्रावणीचं तुम्ही टाळ्या आणि शिट्यांनी स्वागत केलं, पण ते माझं… जेनेलियाची ती इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत…

By Viraltm Team

Published on:

शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी जेनेलिया आणि रितेश देशमुखचा वेड चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाला दर्शकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर्शक जेनेलिया आणि रितेश देशमुखचे कौतुक करत आहेत. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल १३ कोटीचा गल्ला जमवला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने वेड चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. अजय-अतुल यांनी चित्रपटाला उत्कृष्ट सांगितल दिले आहे जे काळजाचे ठाव घेते. चित्रपटामधील सुरेल गाणी दर्शकांना अक्षरशः वेड लावत आहेत. अशोक सराफ, जिया शंकर, शुभंकर तावडे, विद्याधर जोशी या कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाने दर्शकांवर छाप सोडली आहे.

चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे जी सध्या खूपच व्हायरल होत आहे. वेड चित्रपटामधून जेनेलियाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. वेद चित्रपट सुरु होतो आणि श्रावणी रिक्षामधून बाहेर पडतो. यादरम्यान तिला दर्शकांवरून टाळ्या आणि शिट्यांची दाद मिळते.

या प्रतिसादाबद्दल जेनेलियाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट शेयर केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे कि रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. श्रावणीचं टाळ्या, शिट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

चित्रपटाला दर्शकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तर जेनेलियाला पदार्पणामध्ये जे प्रेम मिळालं आहे ते असे राहावे अशी अभिनेत्रीची इच्छा आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाची जोडी सुरुवातीपासूनच दर्शकांचे मन जिंकत आहे. चित्रपटाचे यश पाहता मराठी चित्रपटाला चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

Leave a Comment