Tutorials Point

अभिनेत्री मंजिमा मोहनने नुकतेच तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड गौतम कार्तिक सोबत लग्न केले आहे. २८ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे दोघांचे ग्रॅण्ड वेडिंग पार पडले. अभिनेत्रीने आपल्या लग्नामध्ये घातलेल्या सुंदर साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि जेव्हा तिने आपले फोटो सोशल मिडियावर शेयर केले तेव्हा तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले.

सोशल मीडियावर तिला बॉडी शेमिंग केले गेले. हे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा अभिनेत्रीला अशा कमेंट्सला सामोरे जावे लागले. अभिनेत्री मंजिमा अनेक दिवसांपासून तिच्या जाडेपणापणामुले ट्रोलिंगची शिकार होत आहे. नुकतेच केलेल्या या कमेंट्सवर प्रतिक्रिया देताना मंजिमा म्हणाली कि आता तिला याची सवय झाली आहे आणि तिला अशा कमेंट्सचा त्रास होत नाही.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना अभिनेत्रीने खुलासा केला कि तिच्यावर आता ट्रोलिंगचा काहीच परिणाम होत नाही. तिने हे देखील म्हंटले कि आता तिला काही करायचे असेल तर सर्वात पहिला ती आपले वजन कमी करेल. माझ्या लग्नामध्ये देखील मला माझ्यावर जाडेपणाबद्दल कमेंट केली गेली.

आधी मला वाईट वाटायचे पण आता मी माझ्या बॉडीशी कंफर्टेबल आहे आणि मला माहित आहे कि माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी माझे वजन कमी करू शकते. मी माझ्या फिटनेसवर लक्ष देत आहे आणि मी आनंदी आहे. प्रोफेशनली जर मला वजन कमी करायची गरज असेल तर मी त्यावर निश्चित रूपाने काम करेन.

मंजिमा मोहनने हे सांगताना आले बोलणे संपवले कि, तिला हे समजत नाही कि तिच्या वजनाचा इतरांना का त्रास होतो. तथापि ती सध्या आपल्या वजनावर खुश आहे आणि तिला फरक पडत नाही कि लोक तिच्याबद्दल काय बोलतात. मंजिमा मोहन आणि गौतम कार्तिक तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि शेवटी त्यांनी लग्न केले. सोशल मिडियावर दोघांनी आपल्या रिलेशनबद्दल घोषणा करून लग्न केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjima Mohan (@manjimamohan)