प्रसिद्ध डांसर गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. यामुळे सर्वत्र सध्या एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलच्या न कळत ती कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता जो जाणीवपूर्वक सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला.
या प्रकरणावर सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या व्हिडीओबद्दल एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस देखील आता या प्रकरणामध्ये कसून चौकशी करत आहेत. व्हिडीओ प्रकरणी सोशल मिडियावर देखील निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकांनी तर दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये पुण्यामधील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने तक्रार नोंदवली आहे. महिलेने तक्रार केली आहे कि तिचा आणि तिच्या सहकाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. हा व्हिडीओ काही लोकांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील शेयर केला होता.
पोलीस आता याबद्दल कसून चौकशी करत आहेत. राज्य महिला अयोग्याच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील टि्वट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कडक कारवाई केल्याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान गौतमी पाटीलचा एका फंक्शन दरम्यानचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला होता.
View this post on Instagram
ज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर तिचे चाहते देखील संतापले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या चौकशी दरम्यान हि माहिती समोर आली. या प्रकरणाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या कि महिलांबाबतचे गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करावा. त्याचबरोबर आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे, याबाबत कारवाई केली जाणार आहे.
View this post on Instagram