महाराष्ट्रामध्ये आपल्या लावणीमुळे खूपच चर्चेमध्ये असलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. तिच्या लावणीवर सध्या चाहते खूपच फिदा आहेत. तिच्या कार्यक्रमामध्ये दर्शकांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ती नेहमी वादामध्ये देखील अडकलेली पाहायला मिळते.

अशामध्ये तिच्यासोबत एक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये रिलस्टार गौतमी पाटीलच्या बदनामीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यामध्ये एका स्टेज शोदरम्यान तिचा कपडे बदलतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या गौतमी पाटीलची लोकप्रियता खूपच वाढत असल्याचे पाहून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. यावेळी सोशल मिडिया युजर्स आपली प्रतिक्रिया देत म्हणत आहेत कि जरी ती चुकीचा डांस करत असली तरी तिच्यावर अन्याय झाला आहे.

गौतमी पाटील पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शोसाठी पोहोचली होती. यादरम्यान कार्यक्रमामध्ये तुफान गर्दी झाली होती. साताऱ्यातील चेतन शिंदे यांनी त्यांचा मुलगा मल्हारच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान गौतमीने मल्हारला केक भारत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाला एकच गर्दी झाली.