समृद्धी महामार्गावून धावणारी पहिली बस शिर्डीत झाली दाखल, पहा फक्त इतक्या वेळामध्ये पोहोचली…

By Viraltm Team

Published on:

महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या महामार्गामुळे नागपूर-शिर्डीमधील अंतर खूपच कमी झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर महामार्गावरून नागपूर-शिर्डी पहिली बस धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसला हिरवा झेंडा दाखवून बस रवाना केली. दुपारी ३.३० वाजता हि बस निघाली होती.

बस शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर प्रवासी बसचे स्वागत नगर-मनमाड रोड कोकमठाण येथील सर्कल साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. बसमधील प्रवास्यांनी महामार्गावरील प्रवासाचा आनंद घेतला.

बसचा चालक म्हणाला कि साईबाबांचे नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान दुपारी ३.३० वाजता आम्ही निघालो आणि रात्री १०.१५ वाजता शिर्डीमध्ये पोहोचलो. आम्हाला जेमतेम साडेसहा तास लागले. अवजड वाहन असल्यामुळे वेगमर्यादा ८० होती.

पहिल्यांदाच आम्ही समृद्धी महामार्गावर प्रवास केला. रोडवून प्रवास करताना आम्ही खूप आनंद घेतला. शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी इतक्या कमी वेळामध्ये पोहोचलो याचे खूपच समाधान वाटले. साडे सहा तासांमध्ये आम्ही शिर्डीत पोहोचलो असे बसमधील प्रवास्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग तब्बल १० जिल्हे आणि २६ तालुके जोडणारा असून, हा मार्ग महाराष्ट्रसाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई प्रवास फक्त ८ तासांत होणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते तर आता फक्त ६ तासात हा प्रवास होणार आहे.

Leave a Comment