Qries

काही गोष्टी आपल्या खूप भ्रमित करतात. आपण जेव्हडे समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हढे त्यामध्ये गुंतत जातो. ऑप्टिकल इल्यूजन देखील असेच असतात. ज्यामुळे आपण चक्रावून जातो. ऑप्टिकल इल्यूजन वास्तविक एका भ्रमाप्रमाणे असतात. सोशल मिडियावर ऑप्टिकल इल्यूजन संबंधी अनेक फोटो आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये काही खास गोष्टी लपलेल्या असतात. यामधील गोष्टी शोधून काढण्याचे आपल्यासमोर आव्हानच असते.

हि गोष्ट जितकी सोपी वाटते तितकी ती अवघड असते. तुम्हाला जर एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो दिला आणि त्यामधील रहस्य शोधून काढायला सांगितल्यास तुम्हाला देखील घाम फुटेल. अशा फोटोंना उगाच भ्रमित करणारे म्हणून ओळखले जात नाही.

अनेक ऑप्टिकल इल्यूजन तर असे असतात कि ज्यांना सॉल्व करण्यामध्ये ९९ टक्के लोक फेल होतात. काही लोक असे असतात ज्यांच्या बुद्धीची ट्यूब लगेच पेटते. असाच एक भ्रमित करणारा ऑप्टिकल इल्यूजनचा एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

हे ऑप्टिकल इल्यूजन हंगरीचा आर्टिस्ट गेर्जली डुडासने क्रिएट केले आहे. ज्याला डुडोल्फ नावाने देखील ओळखले जाते. फोटोमध्ये तुम्ही पाहून शकता कि तुम्हाला अनेक पक्षी पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक पेंग्विन लपून बसला आहे. ज्याला शोधून काढणे समुद्रामधून सुई शोधण्यासारखे आहे.

चला आम्ही तुमचे काम थोडे सोपे करतो. पेंग्विनचे पोट पांढरे असते आणि त्याचा चेहरा धूसर असतो. आता कदाचित तुम्ही त्याला शोधून काढू शकाल. पण जर इतकी हिंट देऊन देखील तुम्हाला पेंग्विन सापडत नसेल तर खाली दिलेल्या फोटोमध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पाहा तुम्हाला पेंग्विन दिसेल.