सोशल मिडियामुळे जग खूप जवळ आले आहे. काही मिनिटांमध्ये हवी ती माहिती आपल्याला सहजपणे मिळवता येते. याच सोशल मिडियावर अनेक गोष्टी व्हायरल झालेल्या पाहायला मिळत असतात. यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन वाले फोटो देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात. असेच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
फोटोमध्ये तुम्हाला एक मुलीचा हात पाहायला मिळत आहे. तिने हातामध्ये एक घड्याळ देखील घातले आहे. फोटो पाहताच हे समजते कि हा एका मुलीचा हात आहे. पण फोटोमध्ये एक मोठी चूक आहे. जी आपल्या प्रथमदर्शनी पाहताना समजत नाही.
फोटोमधील चूक शोधून काढण्यासाठी तुमची नजर खूपच घारीसारखी तीक्ष्ण असायला हवी. फोटोमध्ये मुलीच्या हातामध्ये अंगठी आणि घड्याळ दिसत आहे. लोकांना या फोटोमध्ये अंगठीमध्ये काहीतरी दडले असल्याचे वाटते. त्याचबरोबर घड्याळाचे काटे चुकीचे असल्याचे देखील वाटते. पण अंगठी आणि घड्याळामध्ये काहीच चूक नाही.
सोशल मिडियावर व्हायरल आलेलेले हे ऑप्टिकल इल्यूजन डोळ्यांना धोखा देणारे आहे. तुम्ही जो फोटो पाहत आहात तो योग्य आहे असा आपला भ्रम होतो पण खरी वस्तुस्थिती वेगळीच असते. तसेच या फोटोमध्ये द्केहील आहे. फोटोमध्ये मुलीच्या नखांवर नेलपेंटही देखील दिसत आहे. अनेक लोकांना लक्षपूर्वक पाहून देखील फोटोमधील चूक शोधता आलेली नाही.
जर तुम्हाला देखल फोटोमधील चूक शोधता आलेली नसेल तर आम्ही तुमची मदत करतो. फोटोमध्ये मुलीच्या हातामधील जे घड्याळ आले त्याच्या चावीची जागा चुकीची आहे. हि गोष्ट इतक्या सहजासहजी दिसून येत नाही. हीच एकमेव चूक या फोटोमध्ये आहे.